Author: saimat

 चोपडा तालुक्यात ६.३३ लाखांचा साठा जप्त साईमत/ चोपडा/ प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात अनुदानित युरिया व इतर रासायनिक खतांची शेजारच्या राज्यात विनापरवाना तस्करी सुरू असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला असून कृषी विभाग व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ६ लाख ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर मार्गे अनुदानित खतांची अवैध वाहतूक करून ती सीमावर्ती राज्यात विक्रीसाठी नेली जाणार असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय भरारी पथकाने तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर कृषी विभाग व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने वैजापूर परिसरात सापळा…

Read More

साईमत / नवी दिल्ली  पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताविरोधात भडकावू आणि वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उद्देशून युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या ‘मरका-ए-हक’ या कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, गेल्या वर्षी पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर संशय घेत हल्ला केला होता. भविष्यात पुन्हा असे प्रकार घडल्यास पाकिस्तानकडून “अधिक जोरदार आणि निर्णायक प्रत्युत्तर” दिले जाईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमात त्यांनी भारताला उद्देशून आक्रमक भाषा वापरत पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली…

Read More

भाविकांना मोठा दिलासा; काशी विश्वनाथ आणि राम मंदिरासाठी थेट प्रवासाची सोय साईमत/ मुंबई  भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी भेट दिली असून दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या मुंबई आणि पुणे परिसरातून धावणार असून थेट उत्तर प्रदेशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, एक अमृत भारत एक्सप्रेस वाराणसी (बनारस) ते पुणे हडपसर दरम्यान धावणार आहे, तर दुसरी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. वाराणसी–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 02531) वाराणसीहून…

Read More

महापौर दीपमाला काळे यांची प्रस्तावित सबस्टेशन जागांची प्रत्यक्ष पाहणी साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी शहरातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (दि. ६ मे) महावितरणच्या प्रस्तावित सबस्टेशनसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या विविध जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. महापौरांनी शहरातील निवडलेल्या विविध ठिकाणी भेट देत त्या जागांची भौगोलिक स्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यात सबस्टेशन उभारताना उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील वीजवितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची मानली जात आहे. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी, जागेची उपयुक्तता आणि स्थानिक पातळीवरील अडथळे…

Read More

साईमत/ नवी दिल्ली  राज्यात सध्या हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून उकाडा कमी होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही…

Read More

ट्रकच्या टायरची हवा तपासताना स्फोट  साईमत/ नंदुरबार/ प्रतिनिधी : तळोदा बायपास परिसरात बुधवारी (दि. 6 मे 2026) सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रकच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या स्फोटात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. सानेश्वर दिलीप मिस्तरी (वय 37, रा. नरडाणा, ता. शिंदखेडा) असे मृत चालकाचे नाव आहे. ते गुजरातमधील नशिराबाद येथून सिमेंटच्या गोण्या घेऊन ट्रक (क्र. MH 18 BG 874) द्वारे तळोदा येथे आले होते. माल उतरवल्यानंतर ते नेहमीप्रमाणे ट्रकची तपासणी करत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. टायरमध्ये हवा तपासत असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी अधिक होती की चालकाला सावरण्याची संधीही मिळाली…

Read More

काकीनाडा–हिसार एक्स्प्रेस कायमस्वरूपी, खानदेशाला मोठा दिलासा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळे श्री खाटू श्याम मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काकीनाडा टाऊन–हिसार विशेष एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी नियमित गाडी म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली असून, यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर परिसरातील प्रवाशांना या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहतुकीचा खर्चिक पर्याय किंवा अनेक गाड्यांचे बदल करत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत होता. मात्र आता थेट रेल्वे जोडणी उपलब्ध झाल्याने हा प्रवास अधिक सोपा आणि परवडणारा होणार आहे. सध्या 07717/07718…

Read More

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या साईमत/ पुणे  पुणे शहरात महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, पर्वती पायथा परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाने स्वतःच्या नऊ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, शेजाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पीडित मुलीचा सख्खा आजोबा आहे. त्याने मुलीला घरात एकटे गाठून माळ्यावर बोलावले आणि तिचे कपडे काढून…

Read More

शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणादायी उजळणी साईमत/जळगाव / प्रतिनिधी समाजात समता, न्याय आणि प्रगतीचा विचार रुजवणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जळगावात “समता दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अर्पण सेवा ट्रस्ट आणि पवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आयोजित “कृतज्ञता पर्व” कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करत समाजातील सर्व घटकांपर्यंत समतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. अर्पण सेवा ट्रस्टचे सचिव रघुनाथ राणे यांनी सांगितले की, शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम, पोवाडे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित…

Read More

चिमुरडीवरील अत्याचारानंतर चोपड्यात जनआक्रोश मोर्चा साईमत/ चोपडा / प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद चोपडा शहरासह तालुक्यात उमटले आहेत. या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ चोपडा बहुभाषिक ब्राह्मण संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत संताप व्यक्त केला. “नराधमाला फाशी झालीच पाहिजे!” या संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चामध्ये संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक स्तरातील कार्यकर्ते तसेच बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सहभागी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या. या वेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच तहसीलदार भाऊसाहेब…

Read More