साईमत/ चंदीगड हैदराबादहून चंदीगडला आलेल्या इंडिगोच्या विमानात (फ्लाईट 6E 108) मंगळवारी लँडिंगनंतर भीषण घटना घडली. विमान धावपट्टीवर टॅक्सी वेकडे जात असताना एका प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट होऊन आग लागली. यामुळे विमानाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे उतरले होते. मात्र, टॅक्सी वेदरम्यान अचानक एका बॅगेतील पॉवर बँकने पेट घेतला आणि काही क्षणांतच धूर संपूर्ण केबिनमध्ये पसरला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी तात्काळ आपत्कालीन दरवाजे उघडले आणि प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. प्रवाशांना थेट धावपट्टीवर उतरवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रवासी घाबरून विमानातून बाहेर…
Author: saimat
करिश्मा नायर यांची अचानक पाहणी रावेर तालुक्यात प्रशासन हादरले साईमत/ रावेर / प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार, ५ मे रोजी त्यांनी रावेर तालुक्यात अचानक धावता दौरा करत विविध शासकीय कार्यालयांची सखोल पाहणी केली. त्यांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’मुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली. पंचायत समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंत तपासणीचा धडाका दौऱ्याची सुरुवात रावेर पंचायत समितीपासून करण्यात आली. येथे त्यांनी प्रलंबित फाईल्स, आस्थापना विषय आणि दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कामकाजातील दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत कामात गती आणण्याचे…
आरोपींना तात्काळ अटक करण्याची नगरसेवक अरविंद देशमुख यांची मागणी साईमत/ जळगाव / प्रतिनिधी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा एकदा शहरात चर्चा पेटली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याआधीच तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनानेही स्वतंत्रपणे सरकारी फिर्याद नोंदवल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सध्या या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांना जामीन मिळाल्यास तपास प्रक्रियेत अडथळे…
साईमत/ नाशिक नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील गंगासागर नगरमध्ये सोमवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ३६ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलेचे नाव सोनाली रवींद्र साळवे (वय 36) असे आहे. त्या नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत असताना अचानक गॅसगळती झाली आणि त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोट इतका तीव्र होता की काही क्षणांतच घरातील कपडे, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मोठ्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती…
साईमत/ नाशिक राज्यातील बालमृत्यू आणि लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र लसीकरण कृती दलांची स्थापना करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे. बालकांचे वेळेवर आणि संपूर्ण लसीकरण ही सोपी, कमी खर्चिक आणि प्रभावी उपाययोजना असल्याने नियमित लसीकरण कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबविण्यावर शासनाचा भर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध लसीकरण मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्यांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे. राज्यस्तरीय लसीकरण कृती दलाचे नेतृत्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी करणार असून, या दलात सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास,…
महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणीनंतर मोठी कारवाईचे संकेत उद्यापासून स्वच्छता मोहिमेचा धडाका साईमत/ जळगाव / प्रतिनिधी शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या महात्मा फुले मार्केटच्या दुरवस्थेवर अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मंगळवार, ५ मे रोजी महापौर दीपमाला काळे यांनी अचानक मार्केट परिसराची पाहणी करत अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढत्या अतिक्रमणाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले. पाहणीदरम्यान मार्केट परिसरात सर्वत्र पसरलेला कचरा, साचलेली घाण आणि अनियंत्रित अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास समोर आला. या परिस्थितीवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी संवाद…
साईमत/ नागपूर नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी (IIIT) मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयश चंद्रकांत माने (मूळ रा. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो IIIT नागपूरमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे सुमारे 4 वाजता त्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारल्याचे समोर आले आहे. श्रेयश काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. तो नियमितपणे वर्गात उपस्थित राहत नव्हता तसेच मित्रांशीही कमी बोलत होता, असे…
साईमत/ मुरबाड माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. एसटी बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगाराची एसटी बस सकाळी सुमारे 8.30 वाजता कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाली होती. बस मुरबाड तालुक्यातील टोकावडे–वैशाखरे परिसरात पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओसोबत तिची जोरदार टक्कर झाली. या धडकेत स्कॉर्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.…
साईमत/ नांदेड शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. खडकापुर ते वाघी रोड परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकावर तसेच पोलिसांवर काही नागरिकांकडून विरोध करत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेचे पथक खडकापुर–वाघी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सोमवारी गेले होते. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी महापालिकेच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच संतप्त जमावातील काही तरुणांनी थेट जेसीबीवर चढून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून जेसीबी चालकाची सुटका केली…
महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन; ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटचा निर्णय साईमत/ जळगाव / प्रतिनिधी शहरातील वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाधारित उपायांना चालना देण्यासाठी “कूल रूफ सोल्युशन” या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी समता नगर (प्रभाग क्र. १२) येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे पत्र्याच्या घरांतील तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणातून समोर आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, उपायुक्त धनश्री शिंदे, उपआयुक्त पंकज गोसावी तसेच नगरसेवक नितीन बरडे, उज्वला बेंडाळे आणि गायत्री राणे यांच्यासह अनेक…