भरउन्हात कष्टकऱ्यांना पोलिसांची मायेची सावली; जळगाव पोलिसांचा संवेदनशील उपक्रम साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत असून तापमानाचा पारा तब्बल ४५ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. अशा कडक उन्हातही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला दिवसभर व्यवसाय करताना दिसतात. या कष्टकरी हातांच्या संघर्षाची दखल घेत जळगाव पोलीस दलाने एक हृदयस्पर्शी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने भरउन्हात उभे राहून व्यवसाय करणाऱ्या २० निवडक किरकोळ विक्रेत्यांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांना मोठ्या छत्र्या तसेच गार पाणी साठवण्यासाठी दर्जेदार ‘मिल्टन’ कंपनीच्या वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाच्या झळा…
Author: saimat
सिव्हिल हॉस्पिटलजवळील भूखंड वाद अखेर मनपाच्या बाजूने साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद अखेर महापालिकेच्या बाजूने निकाली निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. पियुष नरेंद्र (अण्णा) पाटील यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर जळगाव महानगरपालिकेने संबंधित जागेवर कारवाई करत भूखंड अधिकृतपणे आपल्या ताब्यात घेतला असून, तिथे मालकी हक्काचा फलकही लावण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचा मौल्यवान भूखंड वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारील हा भूखंड काही वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी देण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम न झाल्याने महापालिकेने तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर स्थानिक नागरिक व तरुण या…
साईमत / मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज खराब हवामानाचा मोठा फटका बसल्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी येथून साताऱ्यातील दरे या गावी जात असताना, कल्याण आणि मुरबाड परिसरात अचानक आलेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरचे नियंत्रण बिघडले. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पीए आणि ओएसडी यांच्यासह हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे रवाना झाले होते. मात्र, कल्याण–मुरबाड परिसरात हवामानात अचानक बदल झाल्याने हेलिकॉप्टर हवेतच अडकले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले. त्यानंतर जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या प्रसंगामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या…
२२ तास मृत बाळ गर्भात ठेवल्याचा आरोप; डॉक्टरांच्या हलगर्जीवर चौकशी समिती नेमली साईमत / परळी परळीतील एका खाजगी रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित महिलेवर सुरुवातीपासूनच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. महिलेच्या पती वैजनाथ मुंडे यांनी आरोप केला आहे की, चुकीच्या उपचारामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत बाळ सुमारे 22 तास गर्भातच ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिलेवर परळीतील डॉ. कल्पना गित्ते यांच्या खाजगी रुग्णालयात सुमारे आठ…
जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे; कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता साईमत / जळगाव गेल्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मात्र आता या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी…
‘आधी कर्तव्य, मग अधिकार’; डॉ. राधेश्याम चौधरींचा आदर्श संदेश साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : राजकारणात पद मिळाल्यानंतर अधिकारांची अपेक्षा व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पदाचा मान स्वीकारतानाच कर्तव्यालाच प्राधान्य देत एक वेगळाच आदर्श नागरिकांसमोर ठेवला आहे. महानगरपालिकेचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी तत्काळ आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वैयक्तिक मालमत्ता कर आगाऊ भरून जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका अधोरेखित केली. जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉ. चौधरी यांची नुकतीच निवड करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांकडून निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता थेट कर विभागात जाऊन मालमत्ता कर भरला. यामुळे उपस्थित…
साईमत / नागपूर सोशल मीडियावरील मैत्रीतून निर्माण झालेल्या वैराने नागपूरच्या कळमना परिसरात 17 वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील वाद आणि एका अल्पवयीन मुलीवरून निर्माण झालेल्या तणावातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेच्या रात्री जोहरान नावाच्या तरुणाला इन्स्टाग्रामवरून कॉल आला. “मित्राला भेटून येतो,” असे सांगून तो घराबाहेर पडला. मात्र, हा कॉल त्याच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला. वाजपेयी नगर परिसरातील एका मोकळ्या मैदानात आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर व मानेवर गंभीर वार झाल्याने जोहरान रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल…
नसरापूर अत्याचारप्रकरणी शिवसेना महिला आघाडी आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर साईमत/पाचोरा / प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी तीव्र मागणी पाचोरा येथील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजात अशा नराधमांना कोणतीही जागा नसल्याची संतप्त भावना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुधवार, ७ मे रोजी पाचोरा येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,…
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा निर्णायक पाऊल; शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा आणि बसस्थानकांवर आता वाढणार कडक गस्त साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा कणा मानले जाणारे ‘दामिनी पथक’ गेल्या काही दिवसांपासून निष्क्रिय झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र या परिस्थितीला आता पूर्णविराम मिळाला असून, पोलीस प्रशासनाने बुधवार, ६ मे पासून हे विशेष पथक पुन्हा नव्या जोमाने सक्रिय करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, छेडछाड आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे त्रासदायक प्रकार रोखण्यासाठी हे पथक आता शहरभर सतत गस्त घालणार आहे. विशेष म्हणजे, अरुंद गल्ल्यांपासून ते गर्दीच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी पथकाला एक…
साईमत/ जळगाव सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची सुरुवात धक्कादायक ठरली आहे. जळगावच्या सराफा बाजारात व्यवहार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून १ तोळा सोन्यासाठी जीएसटीसह सुमारे ₹१,५५,२२१ मोजावे लागत आहेत. तर १० तोळा सोन्याचा दर तब्बल ₹२९,००० ने वाढून सुमारे ₹१५,५२,२१० पर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. १ ग्रॅम चांदीच्या दरात वाढ होऊन १ किलो चांदीचा भाव सुमारे ₹२,५८,३५० (जीएसटीसह) इतका झाला आहे. यामुळे चांदीच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार…