डमी ग्राहकाच्या मदतीने कारवाई; मुख्य आरोपी अटकेत, पीडित महिलांची सुटका साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील टॉवर चौक परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. एका नामांकित लॉजवर महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने ही कारवाई पार पाडली. या प्रकरणात राजू मोतीराम जोशी याला अटक करण्यात आली असून, घटनास्थळावरून रोख रक्कम आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना ९ मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय माहिती मिळाली होती. या…
Author: saimat
‘दामिनी पथक’च्या उपस्थितीने खळबळ साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरांपैकी एक असलेल्या एम. जे. कॉलेज परिसरात आज पोलिसांनी काही कॅफेंवर अचानक धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवली. या कारवाईमुळे परिसरातील कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण भागात पोलिसांच्या हालचालींमुळे तणावाचे वातावरण दिसून आले. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. महाविद्यालय परिसरात काही कॅफेंमध्ये नियमभंग आणि संशयास्पद गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेचे नियोजन नितीन गणापुरे यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल…
फुले मार्केट, दाणा बाजार व कोंबडी बाजारात अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची कारवाई साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहरातील फुले मार्केट, दाणा बाजार आणि कोंबडी बाजार परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळपासून मोठी कारवाई करत अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. सकाळी 8 वाजता सुरू झालेली ही कारवाई दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती. फुले मार्केट परिसरात पथकाने अचानक तपासणी सुरू केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी तसेच कार्यालयीन वापरासाठी मीटर रूममध्ये अनधिकृतपणे ठेवलेले टेबल, बाकडे आणि इतर साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर दाणा बाजार आणि कोंबडी बाजारातही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर…
कर्तव्यातील निष्काळजीपणा भोवला साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : पोलीस दलाच्या शिस्त व कर्तव्यनिष्ठेला धक्का देणारी गंभीर घटना जळगाव पोलीस मुख्यालयात उघडकीस आली असून, कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी दोन पोलीस अंमलदारांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केली असून संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. या तपासणीत सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोन्ही अंमलदार आपल्या कर्तव्यस्थळी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान आणखी गंभीर प्रकार समोर आला. गार्ड रूममध्ये ठेवलेल्या तीन एसएलआर रायफल्सपैकी…
साईमत / नागपूर देशातील प्रमुख शहरांमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक चित्र समोर आले आहे. ‘एनसीआरबी’च्या (National Crime Records Bureau) २०२४ सालच्या अहवालानुसार नागपूरमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर मुंबई आणि पुण्यापेक्षा अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये नागपूरमध्ये महिलांविरोधातील एकूण १,५१३ गुन्हे नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबईत ६,३५८ आणि पुण्यात २,६३१ गुन्ह्यांची नोंद झाली असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हे दर नागपूरमध्ये सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरमध्ये महिलांविरोधातील गुन्हे दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे १२३.८ इतका आहे. तुलनेत मुंबईत हा दर ७४.६ आणि पुण्यात ११०.१ इतका आहे. या आकडेवारीनुसार नागपूरचा देशातील प्रमुख शहरांमध्ये सातवा क्रमांक लागतो. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या…
जळगावात एकाच दिवशी लोक अदालतीचे आयोजन साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहिलेल्या खटल्यांमुळे नागरिकांना होणारा आर्थिक खर्च, मानसिक ताण आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच वाद आपसातील सामोपचाराने मिटावेत या उद्देशाने ९ मे २०२६ रोजी देशभर एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार पडणार असून, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या लोक अदालतीचे…
खेडशिवापूर टोल नाक्याजवळ थरारक अपघात! टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार, परिसरात हळहळ साईमत / पुणे पुणे–सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे थरारक दृश्य पाहायला मिळाले. मृत व्यक्तींची ओळख राजेंद्र बबन मोरे आणि सविता राजेंद्र मोरे अशी झाली असून ते पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे दोघे दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने जात असताना…
सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच मिळणार अपॉइंटमेंट; वाहनधारकांना RTOचे आवाहन साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन कार्यालयातील विविध सेवांसाठी दिल्या जाणाऱ्या अपॉइंटमेंटच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून आता सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच अपॉइंटमेंट दिल्या जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून दुपारच्या वेळेत नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाहनमालक, चालक तसेच अनुज्ञप्तीधारकांना विविध कामांसाठी RTO कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास होऊ नये व त्यांचे आरोग्य सुरक्षित…
प्रेमसंबंधातून थरारक हत्याकांड! थेरगावमध्ये १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; पोलिसांकडून ८ तासांत आरोपी अटक साईमत / पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा भाऊही गंभीर जखमी झाला असून, काळेवाडी पोलिसांनी अवघ्या ८ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही घटना थेरगाव येथील शिवशंकर कॉलनीतील श्रीकृष्ण दूध डेरीसमोर घडली. सुभान शेख (वय १९) या तरुणावर चाकू आणि चॉपरने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा भाऊ अर्शद शेख गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता सुभान आणि त्याचा भाऊ…
“कर भरायचा नागरिकांनी आणि बदल्यात खड्डे सहन करायचे?”; संतप्त नागरिकांचा सवाल साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, या प्रश्नाकडे महानगरपालिकेचे होत असलेले दुर्लक्ष आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. परिसरातील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा केल्या जात असताना सुप्रीम कॉलनी परिसर मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सुप्रीम कॉलनी रिक्षा स्टॉप ते सागर अपार्टमेंट तसेच सागर अपार्टमेंट (गीतांजली केमिकल) ते कृष्णानगर…