८९ शस्त्रांचा साठा जप्त; अमेरिका–कॅनडा दरम्यान तस्करीचा प्रयत्न उधळला साईमत / वृत्तसंस्था अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोलिसांनी शस्त्रास्त्र तस्करीच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करत ८९ शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका पाकिस्तानी नागरिकासह तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यूएस अटर्नी ऑफिस फॉर सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्कच्या माहितीनुसार, न्यूयॉर्क स्टेट पोलिसांनी स्टेट रूट-९० वर एका वाहनाला थांबवून तपासणी केली. चौकशीदरम्यान संशयास्पद उत्तरे मिळाल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून काही शस्त्रे कारच्या मागील सीटवर लपवलेली होती. या कारवाईत १७ चोरीच्या बंदुकांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हे शस्त्र…
Author: saimat
मंत्री संजय सावकारे यांच्या हस्तक्षेपामुळे डिझेल संकटावर पडदा साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी : शहरातील कचरा संकलनाचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला असून रात्रीपासून घंटागाड्यांद्वारे कचरा उचलण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांना डिझेल पुरवठा थांबण्याचा अडथळा दूर झाला असून शहरातील स्वच्छता व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या थकित देयकांमुळे पेट्रोल पंप चालकाने डिझेल पुरवठा बंद केला होता. परिणामी घंटागाड्यांची सेवा ठप्प झाली होती आणि शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याच काळात स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या कंपनीनेही काम थांबवल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय…
साईमत / नाशिक सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. एका शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ५० पैसे किलो म्हणजेच ५० रुपये क्विंटल इतका अत्यल्प दर मिळाल्याने त्याने संतापाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू असताना शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी मिळालेला दर ऐकून तो मानसिक तणावात गेला. ज्या पिकासाठी महिनोन्महिने मेहनत आणि मोठा खर्च केला, त्या कांद्याला इतका कवडीमोल भाव मिळाल्याने तो हताश झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त…
शाळा परिसरात उपद्रव करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी : वरणगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात फटाक्यांसारखा मोठा आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्या १५ बुलेटस्वारांवर कारवाई करत त्यांच्या वाहनांवरील मॉडिफाइड सायलेंसर जप्त करण्यात आले आहेत. वरणगाव शहरात विशेषतः सायंकाळी सातनंतर तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन मार्ग, तसेच भुसावळ, मुक्ताईनगर आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बुलेटस्वारांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. भरधाव वेगाने धावणाऱ्या या दुचाक्यांमुळे अचानक होणारा प्रचंड आवाज रस्त्यावरील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होता. अनेक वेळा…
साईमत / जायखेडा जायखेडा परिसरातील बिजोटे येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, कांदा पीक वाचवण्याच्या धावपळीत एका शेतकऱ्याचा वादळी वाऱ्यात झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बापू सखाराम जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बापू जाधव हे आपल्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यासाठी नामपूर येथे गेले होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक हवामानात बदल झाला आणि अवकाळी पावसाची तसेच वादळी वाऱ्याची चिन्हे दिसू लागली. शेतात काढून ठेवलेले कांदा पीक वाचणार नाही या भीतीने ते तातडीने गावाकडे निघाले. अनेक महिन्यांच्या कष्टातून उभे केलेले कांदा पीक पावसात भिजू नये म्हणून त्यांनी विवाहसोहळा अर्धवट सोडून शेताकडे धाव घेतली. गुरुवारी दुपारी आखतवाडे रस्त्याने जात…
साईमत / नाशिक नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) कंपनीने प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देत मागील तीन महिन्यांत ५४ प्रवाशांना एकूण २६ हजार ८५७ रुपयांचा परतावा दिला आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर तत्परतेने कार्यवाही करत प्रशासनाने प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. दररोज हजारो नागरिक सिटीलिंक बससेवेचा लाभ घेत असताना काही वेळा ऑनलाइन तिकीट अथवा पास न मिळणे, बसफेरी रद्द होणे, बँक खात्यातून रक्कम वजा होऊनही तिकीट न मिळणे तसेच गर्दीच्या वेळी वाहकाकडून उर्वरित रक्कम परत मिळण्यास उशीर होणे अशा समस्या उद्भवतात. मात्र अशा प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सिटीलिंक प्रशासनाने प्रवाशांना त्वरित परतावा देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवली आहे. जानेवारी ते…
साईमत / नागपूर कतार एअरवेजने दोहा–नागपूर–दोहा ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा २१ मेपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही सेवा आठवड्यातून पाच दिवस चालत होती, मात्र पश्चिम आशियातील तणाव आणि इतर कारणांमुळे कतार एअरवेजसह काही विमान कंपन्यांनी सेवा तात्पुरती स्थगित केली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने नागपूर आणि आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विमानसेवेचा सर्वाधिक फायदा व्यापारी, विद्यार्थी तसेच आखाती देशांमध्ये कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी दोहा हे महत्त्वाचे ट्रान्झिट हब असल्याने कनेक्टिव्हिटी…
जामनेरमधील अड्ड्यावर छापा, १० लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/जामनेर / प्रतिनिधी : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई करत जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. दिनांक ९ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरामध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळवला जात आहे. या…
साईमत / उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात शनिवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. टिकैतराय तलाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर भाजप युवा मोर्चाचे नेते महाराज चेतन तिवारी उर्फ श्याम चेतन यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी त्यांच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या असून त्यातील एक गोळी कमरेत लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर रक्तबंबाळ अवस्थेत श्याम चेतन रस्त्यावर कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी अवस्थेतील श्याम चेतन यांना त्वरित केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक…
मेहरूण परिसरातून एलसीबीची शिताफीची कारवाई; पुणे पोलिसांच्या तपासाला वेग साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : पुणे शहरातील रायकर मळा परिसरात सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शिताफीने अटक केली. मेहरूण परिसरातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रायकर मळा येथे २ मे २०२६ रोजी घरगुती वादातून भानुदास भास्कर चौधरी यांनी आपल्या सून स्वाती तेजस चौधरी (वय २८) यांच्यावर डोक्यात वार करून त्यांचा खून केला होता. घटनेनंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून तेथून पलायन केले. घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू…