मैत्रिणीनेच ओढले व्यसनात नंतर व्यसन, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार आरोप पोक्सो अंतर्गत तिघांवर गुन्हा साईमत/जळगाव / प्रतिनिधी शहरात महाविद्यालयीन तरुणीला अमली पदार्थांच्या व्यसनाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आणि अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाणे येथे तिघा संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि तिची…
Author: saimat
डोंगरगाव येथे ३५ वर्षीय अविवाहित तरुणाचा मृत्यू परिसरात हळहळ, पोलिसांकडून तपास सुरू साईमत/पाचोरा/ प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे ३५ वर्षीय अविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीवन बाबुलाल गुजर (वय ३५) हे डोंगरगाव येथील रहिवासी होते. ३ जून रोजी ते घरीच होते. त्यानंतर ४ जून रोजी पहाटे कुटुंबीयांच्या निदर्शनास ही घटना आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.…
अल्पवयीन चालकामुळे मोठी दुर्घटना नियंत्रण सुटताच नऊ जणांवर कार चढली साईमत/जळगाव / प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’च्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात असलेल्या भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या नऊ जणांना उडविल्याने मोठी खळबळ उडाली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास रामानंद नगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने एमएच-१५ एफटी-७२०१ क्रमांकाची कार भरधाव वेगाने धावत होती. ही कार सुमारे १५ वर्षांचा…
मध्यरात्रीच्या कारवाईत गोंधळ ३० अधिकाऱ्यांसमोरच डंपर पळवून नेल्याचा आरोप वाळू माफियांचे धाडस साईमत/दापोरा (ता. जळगाव) / प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील दापोरा आणि धानोरा शिवारात अवैध रेती उत्खननाविरोधात मंगळवारी मध्यरात्री महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी सुमारे ३० अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही काही डंपर पळवून नेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या घटनेमुळे संपूर्ण प्रशासनिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोरा व धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर महसूल विभाग…
साईमत न्यूज नेटवर्क – घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन गवळी याने विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट आखला. या कटात त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी यांना सहभागी करून घेतले. योजनाबद्ध पद्धतीने या तिघांनी संदीप चव्हाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार पेटवून देण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून हा…
एका दिवसात ५०० अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे साईमत/चोपडा/ प्रतिनिधी : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपालिकेने मंगळवारी मोठी आणि निर्णायक कारवाई केली. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एका दिवसात तब्बल ५०० अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली ही मोहीम शहराच्या विविध भागांत विस्तारली. मच्छी मार्केट, आझाद चौक, विठ्ठल मंदिर चौक, बोहरा गल्ली, मेन रोड, चावडी चौक आणि गोलमंदिर चौक या अत्यंत गर्दीच्या आणि महत्त्वाच्या भागांमध्ये नगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली. तीन स्वतंत्र पथके आणि तीन जेसीबींच्या सहाय्याने ही…
महापालिकेकडे हॉकर्स झोन तयार करण्याची मागणी साईमत/जळगाव / प्रतिनिधी : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे फेरीवाले व हातगाडीधारकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित करून अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन वाहतुकीला शिस्त लागत असली तरी दुसरीकडे लघु व्यवसायांवर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांमध्ये आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, शहरातील मोठा घटक हा हातगाडी, फेरीविक्री आणि लघु व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यामुळे…
साईमत न्यूज नेटवर्क – देशाची राजधानी नवी दिल्लीतील गजबजलेल्या मालवीय नगर परिसरात आज सकाळी भीषण आग दुर्घटना घडून मोठी खळबळ उडाली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये अचानक लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ हून अधिक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग काही मिनिटांतच पसरली आणि तिने रौद्ररूप धारण केले. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी सुमारे ९.४५ वाजता अग्निशमन विभागाला कॉल प्राप्त झाला होता, तर आग अंदाजे ८.५० वाजता लागल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.…
एकाच दिवशी चार ठिकाणी धडक छापा ८ जण ताब्यात, ३३ हजारांची रोकड जप्त साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरात गुप्तपणे सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी मंगळवारी जोरदार मोहीम राबवत चार ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबविली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गांधी मार्केट, एमआयडीसी परिसर,…
पिकअपच्या जोरदार धडकेत दोन बहिणी ठार, आई-वडील गंभीर जखमी साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी : नातेवाईकांच्या कार्यक्रमावरून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर दहिवद फाट्याजवळ काळाने घाला घातला. समोरून आलेल्या पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला, तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील राकेश शिंदे हे कुटुंबीयांसह मालेगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते छोटा हत्ती वाहनातून गावी परतत असताना दहिवद फाट्याजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात जयश्री राकेश शिंदे (१९) हिने…