साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना मंजूर केल्याचा दावा करण्यात आला असून या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभाच्या अटींवरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला असून केवळ सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये मविआ सरकारकडून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नव्या योजनेत पूर्ण लाभ मिळणार नाही. अशा सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार असून उर्वरित कर्जाची रक्कम त्यांना स्वतः भरावी लागणार आहे. तर ज्यांचे थकीत कर्ज 2 लाख…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे सायबर सुरक्षेसमोरील आव्हाने अधिक गंभीर बनत असताना, Anthropic च्या चर्चेत असलेल्या ‘Mythos’ या प्रगत AI मॉडेलबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सावध पण आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडली आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भारतीय बँकिंग क्षेत्र AI-आधारित धोक्यांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना मल्होत्रा यांनी सांगितले की, RBI ला अद्याप ‘Mythos’ मॉडेलचा प्रत्यक्ष ॲक्सेस मिळालेला नाही. मात्र, संभाव्य AI-आधारित जोखमींना तोंड देण्यासाठी बँकिंग यंत्रणा आवश्यक तांत्रिक तयारीसह सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला. जागतिक स्तरावर ‘Mythos’ मॉडेलबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हे…
साईमत न्यूज नेटवर्क – मोहाली : पंजाबमधील मोहाली येथे प्रेमसंबंध तुटल्यानंतर सूडाच्या भावनेतून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने कार्यालयात घुसून चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेने अधिकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिंपल (रा. पतियाळा) ही तरुणी मोहालीतील एका नामांकित पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीत कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना तिचा माजी प्रियकर व कंपनीतील माजी सहकारी हरविंदर सिंग ऊर्फ हॅरी कार्यालयात आला. काही कळण्याच्या आत त्याने डिंपलवर चाकूने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या…
साईमत न्यूज नेटवर्क – नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील मरियम अम्मा दर्ग्यात एका महिलेवर कथितरीत्या धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलकाता येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील डमडम परिसरात राहणारी महिला एप्रिल महिन्यात मरियम अम्मा दर्ग्यात आयोजित उर्स कार्यक्रमासाठी कामठी येथे आली होती. गेल्या काही वर्षांपासून ती नियमितपणे या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहत होती. मात्र, यंदाच्या भेटीदरम्यान काही व्यक्तींनी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : मीरा रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या कथित बॉयफ्रेंडने केवळ क्षुल्लक कारणावरून तिच्या 4 वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंभू शर्मा हा मृत मुलाच्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेच्या दिवशी घरात असताना आरोपीने मुलाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र,…
महायुतीला मोठा दिलासा; ६ जागा बिनविरोध, ११ मतदारसंघांत सामना रंगणार साईमत/मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष, तसेच अंतर्गत बंडखोरी आणि समेटाच्या राजकारणामुळे अनेक मतदारसंघांचे चित्र बदलले. अर्ज माघारीनंतर राज्यातील ठाणे, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ११ मतदारसंघांत मात्र थेट आणि तिरंगी लढती रंगणार असल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगडमध्ये मोठा राजकीय उलटफेर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी माघार…
साईमत न्यूज नेटवर्क – राजधानी दिल्लीतील मालवीय नगर येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच बिहारमध्ये आणखी एक भीषण घटना घडली आहे. मुझफ्फरपूरमधील ब्रह्मपुरा परिसरातील खासगी प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात लागलेल्या आगीत अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या आगीत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र स्थानिक सूत्रे आणि काही वृत्तांनुसार मृतांचा आकडा १० पर्यंत जाऊ शकतो. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे. घटनेच्या वेळी आयसीयू वॉर्डमध्ये १५ ते २५ रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी सुमारे २० रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात…
२७१ वाहनचालकांवर कारवाई, दोन लाखांहून अधिक दंड वसूल साईमत/जळगाव / प्रतिनिधी जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतूक शिस्त मजबूत करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेकडून विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत बेशिस्त वाहनचालकांवर कठोर पावले उचलत एकाच दिवसात तब्बल २७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही विशेष मोहीम दि. ३ जून रोजी शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आली. हेल्मेट न घालणे, सीटबेल्टचा वापर न करणे, सिग्नल तोडणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना या मोहिमेत लक्ष्य करण्यात आले. या कारवाईतून एकूण दोन लाख तीन हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल…
साईमत न्यूज नेटवर्क – सराफा बाजार आज उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल मानला जात आहे. गुड रिटर्न्सनुसार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ₹१,५६,११० इतका असून त्यात ₹११० ची घसरण नोंदवली गेली आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या मते, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांवर होत असून त्यामुळे किंमतीत चढ-उतार दिसत आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,६११, ८ ग्रॅमसाठी ₹१,२४,८८८, तर १०० ग्रॅमसाठी ₹१५,६१,१०० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१४,३१० असून १० ग्रॅमसाठी ₹१,४३,१०० इतका…
साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची (IAF) हवाई क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार फ्रान्सकडून 114 डसॉल्ट राफेल फायटर विमान खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग देत आहे. सुमारे ₹3.25 लाख कोटींच्या या मोठ्या संरक्षण कराराला लवकरच अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. या व्यवहारासाठी फ्रान्सकडे औपचारिक Letter of Request (LoR) पाठवले जाणार असून त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अधिकृत वाटाघाटी सुरू होणार आहेत. एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान या प्रक्रियेला आणखी गती मिळाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवाई दल सध्या गंभीर स्क्वाड्रन कमतरतेचा सामना करत आहे. नियोजनानुसार IAF कडे किमान 42.5 स्क्वाड्रन्स असणे अपेक्षित असताना, सध्या…