Author: saimat

 ६ महिलांची सुटका; ११ जणांविरुद्ध गुन्हा साईमत/चोपडा/ प्रतिनिधी : शहरातील प्रताप हायस्कूल व तहसील कार्यालयाच्या मागील स्मशानभूमी रस्त्यालगत सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली असून दोन महिलांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर या संपूर्ण प्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित नऊ आरोपी फरार आहेत. गुप्त माहितीवरून पोलिसांचा छापा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान परिसरात सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींची तपासणी केली असता काही महिलांना आर्थिक…

Read More

नियम मोडल्यास दंडाची कारवाई निश्चित साईमत/जळगाव  / प्रतिनिधी : जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचा कडक इशारा महापालिकेने दिला आहे. स्वच्छतेबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेने व्यापारी शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत गोलाणी संकुलातील स्वच्छता, बंद अवस्थेतील कचरा कुंड्या आणि इतर नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त  यांची भेट घेऊन संकुलातील विविध समस्या मांडल्या. विशेषतः कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार, बंद पडलेल्या कचरा…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – राजधानी दिल्लीमधून एक अत्यंत गंभीर आणि मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी देशातील विविध शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता. विशेष म्हणजे, त्यांच्या ‘हिटलिस्ट’वर मुंबई शहराचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी मुंबईतील दादर परिसरासह विविध महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.…

Read More

दर गुरुवारी नागरिकांच्या भेटीला जिल्हाधिकारी तक्रारींना मिळणार QR कोड ट्रॅकिंग सुविधा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेत सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने नवा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. ‘जनसमाधान बैठक’ या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आता नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी जिल्हा मुख्यालयात धाव घ्यावी लागणार नाही, तर उपविभागीय स्तरावरच थेट प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे. या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांची असून, ते स्वतः दर गुरुवारी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. यामुळे महसूल, स्थानिक प्रशासन आणि इतर विभागांशी संबंधित प्रश्नांचा निपटारा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे. तक्रारींचा…

Read More

दुचाकीस्वार ठार महिला गंभीर जखमी चालक फरार तपास सुरू साईमत/यावल/ प्रतिनिधी :  यावल–भुसावळ मार्गावरील अंजाळे घाट परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे आपल्या मोटरसायकलने भुसावळहून यावलकडे परतत होते. त्यांच्या सोबत त्यांची वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या देखील होत्या. त्याच वेळी यावलच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने अंजाळे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की लखन जोहरी यांचा घटनास्थळीच मृत्यू…

Read More

पिस्तूल, काडतुसे, बनावट नंबर प्लेटसह टोळीचा पर्दाफाश साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या धाडसी आणि सतर्क कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट असा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह आणखी दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ पहाटे एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. याचवेळी…

Read More

लाच प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अटकेत साईमत/भुसावळ / प्रतिनिधी : भुसावळ शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) त्याच्या खाजगी पंटरला एसीबीने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात राजू सांगळे आणि त्याचा खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील तक्रारदाराला अटक न करता फक्त प्रतिबंधात्मक (चॅप्टर) कारवाई करून प्रकरण मिटवण्यासाठी PSI राजू सांगळे यांनी…

Read More

साखरपुड्यानंतर महिनाभरातच मृत्यू; पाचोऱ्यात चर्चा आत्महत्या की घातपात?   साईमत/पाचोरा/ प्रतिनिधी : पाचोरा शहरात जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने बुधवारी सकाळी (दि. २८) मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूचे नेमके कारण आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) हा तरुण पाचोरा येथील जळगाव रोड परिसरातील एका लॉजिंगमध्ये आढळून आला. सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण…

Read More

डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्धवट धरणात तरुणाचा मृत्यू साईमत/चाळीसगाव / प्रतिनिधी : बकरी ईदच्या दिवशी चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी एका २० वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोईन जाकीर झारेकरी (वय २०, रा. घाटरोड, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी नागदरोड परिसरातील पाच मित्र बोरखेडा धरण परिसरात फिरण्यासाठी व पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला आनंदात असलेला हा वेळ काही क्षणांतच भीषण दुर्घटनेत बदलला. पोहत असताना मोईनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – भारतात लवकरच कागदी नोटांऐवजी पॉलिमर (प्लास्टिक) चलनी नोटा वापरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढती रोकड मागणी, नोटांच्या छपाईवरील वाढता खर्च आणि खराब होणाऱ्या नोटांचे प्रमाण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा एकदा पॉलिमर नोटांच्या प्रस्तावाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, RBI च्या पाटणा आणि मुंबई येथे झालेल्या मागील दोन संचालक मंडळ बैठकींमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. सध्या वापरात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा अधिक टिकाऊ असून त्यांचे आयुष्यही जास्त असल्याने हा पर्याय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पॉलिमर नोटांच्या छपाईचा खर्च तुलनेने…

Read More