साईमत न्यूज नेटवर्क – NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात “कॉकरोच जनता पार्टी”चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्राम व्हिडिओ जारी करत आपल्या समर्थकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या घडामोडींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित झाले आहे. दीपके यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, NEET परीक्षेशी संबंधित कथित गैरव्यवस्थापन आणि पेपर लीक प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – आग्रा–लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात घडला असून लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसली. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एक कुटुंब राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील लग्न सोहळ्यासाठी प्रवास करत होते. आग्रा–लखनौ द्रुतगती मार्गावर कारचा चालक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून वाहनाचा मोठा भाग कंटेनरमध्ये घुसला. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात…
साईमत न्यूज नेटवर्क – चेन्नईतील एका खासगी बारमध्ये तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेला वाद रस्त्यावर पोहोचून भीषण घटनेत परिवर्तित झाला. या घटनेत १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणीचे नाव यान्सी असून ती श्रीलंकन विस्थापित होती आणि विल्लूपुरम जिल्ह्यात वास्तव्यास होती. या प्रकरणी पोलिसांनी बालामुर्गन (२१), जोशुओ (१९) आणि किशोर कुमार (१९) यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यान्सी आणि तिचे मित्र एका खासगी बारमध्ये डान्ससाठी गेले होते. याचवेळी दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. बारमधील बाऊन्सर्सनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र, बाहेर पडल्यानंतर हा वाद पुन्हा सुरू झाला. यानंतर दोन्ही गटांमध्ये…
साईमत न्यूज नेटवर्क – देशभरातील एलपीजी ग्राहकांना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ केली असून घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 3,113.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 3,071.50 रुपये होती. मुंबईत हा सिलेंडर 3,024 रुपयांवरून 3,067.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. चेन्नईमध्ये किंमत 3,283 रुपये तर बेंगळुरूमध्ये 3,198 रुपये इतकी झाली आहे. अलीकडील भू-राजकीय तणाव आणि वाढत्या जागतिक किमतींचा परिणाम एलपीजी दरांवर दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत कमर्शियल सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून…
साईमत न्यूज नेटवर्क – राज्यातील अनेक भागांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असताना, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांच्या घरी प्रथमच नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. धडगाव तालुक्यातील सादरी परिसरातील पाडे डोंगर-दऱ्यांनी वेढलेले असून येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांना दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची दखल घेत यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी संयुक्तपणे पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विहिरीच्या माध्यमातून…
साईमत न्यूज नेटवर्क – वणी : सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. वणी–कळवण मार्गावरील अहिवंतवाडी शिवारात कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने पुलाचा कठडा तोडून थेट खाली नाल्यात कोसळले. या अपघातात पाच भाविक जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ केके १६९६ क्रमांकाची कार सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन वणीकडे येत होती. दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास अहिवंतवाडी परिसरातील पुलाजवळ वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारने पुलाचा कठडा भेदला आणि खाली नाल्यात जाऊन पडली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत हर्षश्री आहेर (४२), देवदास आहेर (४७), पुष्कर…
साईमत न्यूज नेटवर्क – पोलादपूर (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावाच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात घडला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातात सुवर्णा मार्कंडे आणि अनुश्री मार्कंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्कंडे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात…
साईमत न्यूज नेटवर्क – हिंगोली : जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर जमिनीतून गूढ आवाज येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही वेळातच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी जमा झाले. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असले तरी त्यानंतर निर्माण झालेल्या घबराटीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, या घटनेबाबत ग्रामस्थांकडून भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा करण्यात येत असला, तरी वृत्त लिहिपर्यंत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नव्हता. तसेच या…
साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी नेल आर्टच्या प्रशिक्षण वर्गासाठी जात होती. डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात पोहोचल्यानंतर ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच असल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनीने तातडीने…
नात्यातील ४७ वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार सावदा पोलिसांकडून गुन्हा दाखल साईमत/सावदा (ता. रावेर) / प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, सख्ख्या मावसाकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी यांचे नाते मावसा असे असून, ४७ वर्षीय व्यक्तीने या नात्याचा गैरफायदा घेत गेल्या काही महिन्यांपासून पीडितेवर दबाव टाकून वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार १२ नोव्हेंबर २०२५ ते २९ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले…