श्रीमंतपूर/श्रीभूमी (आसाम): आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील बिलबारी सीमावर्ती भागात ‘पुशबॅक’वरून (कथित स्वरूपात काही लोकांना परत पाठवण्याच्या प्रयत्नावरून) भारत आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ (BSF) आणि ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ (BGB) चे जवान एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सीमेवर काही काळासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. शस्त्रधारी जमाव झिरो लाईनवर: कथित नागरिकांना आपल्या हद्दीत घेण्यास BGB ने नकार दिला. ही बातमी पसरताच शेकडो बांगलादेशी नागरिक हातात चाकू, लाठ्या आणि बांबूचे दंड घेऊन BGB च्या समर्थनार्थ झिरो लाईनवर जमा झाले आणि त्यांनी भारतीय सीमेच्या दिशेने शस्त्रे उगारली. BGB कडून गोळीबाराची धमकी: बांगलादेशच्या पल्लाथल आऊटपोस्टच्या जवानांनी लाऊडस्पीकरवरून BSF ला…
Author: Bharati Bharsake
आर्थिक वादातून टोकाचे पाऊल; “माझ्यानंतर कुटुंबाची जबाबदारी संबंधित डॉक्टरावरच”, पाचोरा पोलीस ठाण्यात नातेवाईकांची प्रचंड गर्दी, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू साईमत -पाचोरा -प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन नावाच्या तरुणाने रेल्वेखाली धावून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात एका डॉक्टरासोबतच्या आर्थिक व्यवहाराचा खळबळजनक खुलासा केला आहे. या घटनेमुळे पाचोरा आणि संभाजीनगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. …आणि डॉक्टरावर केला चाकूने हल्ला! पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान…
सोशल मीडियावरील ‘त्या’ मेसेजमुळे ग्राहकांमध्ये घबराट; बँक ऑफ महाराष्ट्रचे स्पष्टीकरण, पण आरबीआयच्या १० वर्ष जुन्या आदेशाच्या री-एन्ट्रीचे कोडे कायम! मुंबई देशात पुन्हा एकदा नोटाबंदी होणार का? या प्रश्नाने शुक्रवारी सोशल मीडियापासून ते थेट बँकांच्या दरांपर्यंत चांगलाच गोंधळ उडवून दिला. निमित्त ठरले ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अंतर्गत जारी केलेले एक परिपत्रक. २००५ सालापूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील सर्व चलनी नोटांबाबत आरबीआयने ९ जून २०२६ रोजी देशातील सर्व बँक प्रमुखांना एक परिपत्रक पाठवले. या जुन्याच आदेशाला अनुसरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे मुख्य कार्यालयाने १२ जून २०२६ रोजी आपल्या सर्व शाखांना अत्यंत कडक सूचना दिल्या. मात्र,…
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; १० हजारांचे अग्नीशस्त्र जप्त, तांबापुऱ्यातील २५ वर्षीय तरुण अटकेत साईमत- जळगाव – प्रतिनिधी| शहरातील मेहरूण तलाव परिसरात गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) बाळगून दहशत माजवणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मॅगझिनसह लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईमुळे जळगावातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. . पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना २४ जून २०२६ रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. मेहरूण तलाव परिसरात एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगून फिरत असून तो परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले. धनके…
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; अमळनेरकरांमधून तीव्र संताप, चौकशीचे केवळ सोपस्कार की नराधम ठेकेदाराला कोठडी? साईमत -अमळनेर- प्रतिनिधी| शहरात जिवंतपणी माणसाला हालअपेष्टा सहन कराव्या लागतातच, पण मृत्यूनंतरही त्याच्या नशिबी अशी अवहेलना यावी, याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अमळनेर नगरपालिकेच्या ठेकेदाराने संवेदनशीलतेचा पार बोजवारा उडवला असून, एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह चक्क कचरा गोळा करणाऱ्या ‘घंटागाडीत’ टाकून तो अंत्यविधीसाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी मूल्यांचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अमळनेर शहरात दोन दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले. मात्र, दोन…
जळगाव/बऱ्हाणपूर: खान्देशातील जळगावच्या केळीला मिळालेल्या जागतिक बहुमानानंतर आता शेजारील राज्य मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या केळीलाही प्रतिष्ठित ‘भौगोलिक निर्देशांक’ (GI Tag – Geographical Indication) बहाल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ बऱ्हाणपूरला मिळालेल्या या मानामुळे केळी उत्पादक पट्ट्यात आनंदाचे वातावरण असून, मध्य प्रदेशसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या जागतिक मान्यतेमुळे बऱ्हाणपूरच्या केळीला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड म्हणून ओळख मिळणार आहे. याचा थेट फायदा स्थानिक हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना पिकाला अधिक चांगला भाव, विस्तारित बाजारपेठ आणि निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. दीर्घ पाठपुराव्यानंतर मिळाले यश बऱ्हाणपूरच्या केळीला जीआय टॅग मिळाल्यानंतर मध्य प्रदेशच्या…
पुणे: राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड (लोणावळा) येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक मोठे वेगळे वळण मिळाले आहे. या हायप्रोफाइल हत्याकांडात आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून एन्ट्री झाली आहे. पीडित अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालय) चालवला जाईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या निष्पाप मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या…
अमरावती: ”मी इतकी कमजोर नाही की राज्यसभेच्या तिकिटासाठी कोणाच्या दारावर जाईल. २०२४ मध्येही मी तिकिटासाठी कोणाच्या दारात गेले नव्हते आणि आताही गेले नाही. पदं येतील आणि जातील, पण माझी विचारधारा सोडून मी कुठेही जाणार नाही,” अशा अत्यंत स्फोटक शब्दांत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना नवनीत राणा यांनी आपल्या आक्रमक भाषणातून पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जागा मिळवण्यासाठी राणा यांनी मुंबई आणि…
मुंबई: मराठा समाजाला ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि कायदेशीर पुरावे अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक नोंदी शोधणाऱ्या आणि कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा कार्यकाळ आता थेट ३० जून २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे समितीची आतापर्यंतची कामगिरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याचे काम ही समिती गेल्या तीन वर्षांपासून करत आहे. समितीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांतही जाऊन जुने दस्तावेज, निजामकालीन महसुली व शैक्षणिक नोंदी आणि ऐतिहासिक…
मुंबई/जळगाव: जळगाव जिल्ह्यात केळीची बनावट लागवड दाखवून लाटण्यात आलेल्या पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या संदर्भात विधानसभा सदस्य अजय चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी ही मोठी माहिती दिली. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाने उघड केला ‘महाघोटाळा’ कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरमार्फत (MRSAC) आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पीक क्षेत्राची तपासणी करण्यात आली. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:…