Author: Bharati Bharsake

नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे आवाहन; पर्यावरण संवर्धनासाठी नशिराबादकरांच्या सहकार्याची गरज साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी | ​नशिराबाद परिसराची जीवनवाहिनी असलेल्या वाकी नदीला अखेर प्रदूषणाच्या विळख्यातून मोकळा श्वास मिळाला आहे. नशिराबाद नगरपरिषदेतर्फे राबवण्यात आलेली वाकी नदीची व्यापक स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, नदीपात्राने आता स्वच्छ रूप धारण केले आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी स्वतः या मोहिमेत पुढाकार घेत, प्रत्यक्ष कामाचा मागोवा घेतल्याने ही मोहीम फत्ते झाली आहे. ​नदीपात्रात वर्षानुवर्षे साचलेला कचरा, प्लास्टिक, गाळ आणि इतर घाण प्रशासनाने युद्धपातळीवर हटवली आहे. नगरपरिषदेच्या या धडक कृतीमुळे नशिराबादकरांमधून समाधान व्यक्त होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. ​नदीत…

Read More

माजी विद्यार्थी जे. एस. किनगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; २ हजार विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून आनंदोत्सव ​ साईमत -​नशिराबाद-प्रतिनिधी | ​नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलचा ८२ वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. २) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा ‘बीएसएनएल’ (जळगाव) चे सेवानिवृत्त सहाय्यक महाप्रबंधक जे. एस. किनगे उपस्थित होते. किनगे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांना…

Read More

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने अ‍ॅक्शन मोड; गावठी दारूचे कारखाने उद्ध्वस्त, पिस्तूलसह गुटखा जप्त साईमत -जळगाव -प्रतिनिधी | शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी गुन्हेगारी जगतावर अत्यंत कठोर प्रहार केला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आज शहरात राबवण्यात आलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या धडक मोहिमेत पोलिसांनी तब्बल १२ फरार आरोपींना बेड्या ठोकल्या असून, अवैध दारू आणि शस्त्रास्त्रांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या धडक अ‍ॅक्शनमुळे अमळनेरमधील गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ​११० संशयितांची झाडाझडती; वॉरंटची अंमलबजावणी पोलिसांनी पहाटेपासूनच शहरातील संवेदनशील भागात आणि गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकले. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण…

Read More

पुणे/मुंबई: राज्यात अनेकदा मुदतवाढ देऊनही ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) न बसवणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने (RTO) अखेर बुधवारपासून ‘ॲक्शन मोड’वर येत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तपासणी केलेल्या १५८ वाहनांपैकी ५४ वाहने दोषी आढळली. मात्र, राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ८० टक्के पथकांना आपला डिजिटल अहवाल अपलोड करता आला नाही. परिणामी, पहिल्या दिवशी कारवाईचा अचूक आकडा समोर येऊ शकला नसला तरी आगामी काळात ही मोहीम तीव्र होणार असल्याचे संकेत आरटीओने दिले आहेत. ​पावसाचा ‘ब्रेक’, ८०% अहवाल प्रलंबित ​बुधवारपासून राज्यव्यापी मोहीम सुरू झाली असली, तरी वरुणराजाने आरटीओच्या कारवाईचा वेग मंदावला. राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंमलबजावणी पथकांना…

Read More

‘महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू, मोदींचा पत्ता सटकला की भाजपचा बंगला कोसळणार’; मनसेप्रमुखांचा ठाण्यातील पत्रकार परिषदेत भाजपला थेट इशारा साईमत- जळगाव – प्रतिनिधी| “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हे जर देहविक्रीला तयार असतील, तर बाजारात गिऱ्हाईकं तयार आहेतच,” अशा अत्यंत जळजळीत आणि बोचऱ्या शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटातील फुटीर खासदार आणि आमदारांवर टीकास्त्र सोडले. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. तसेच, भविष्यात या सगळ्याचे गंभीर परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा…

Read More

​गुप्त माहितीच्या आधारे विमनातळासमोरील कुंभा-धनवड रस्त्यावर रचला सापळा; २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी आवळल्या मुसक्या साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने २८ जून २०२६ रोजी एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव विमानतळासमोरील कुंभा ते धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा मॅगझीनसह जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​ ​पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विमानतळासमोरील कुंभा ते धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा…

Read More

 हळदी समारंभाच्या एका व्हिडिओने फिरवली तपासाची चक्रे!  साईमत- भुसावळ – प्रतिनिधी| रेल्वे रुळाशेजारी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या संतोष रघुवीर मंचाल यांच्या अंधाऱ्या हत्येचा भुसावळ शहर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने पर्दाफाश केला आहे. कोणत्याही प्रकारचे हत्यार न वापरता केवळ हाता-बुक्क्यांनी केलेल्या जबर मारहाणीत हा खून झाल्याचे समोर आले असून, रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप (भंगार) चोरीच्या वादातून ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी भुसावळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या खळबळजनक प्रकरणाचा उलगडा केला. ​रहस्य: दुर्गम भागात आढळला होता मृतदेह ​गत २८ जून रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगत एका दुर्गम आणि अंधाऱ्या ठिकाणी संतोष मंचाल…

Read More

​’कृषी दिना’निमित्त जळगावात प्रगत शेतकऱ्यांचा गौरव; जिल्हा परिषद सभागृहात उत्साह ​साईमत- जळगाव – प्रतिनिधी| “जळगाव जिल्हा हा कृषी क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, सध्याच्या काळात शेतीचे उत्पादन वाढवताना जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवून कमीत कमी वापराकडे वळावे,” असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ​कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी सन्मान’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, अतिरिक्त सीईओ रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी…

Read More

सीईओ करिश्मा नायर यांची मोठी घोषणा; जुलै महिन्यात जिल्हाभर राबवणार ‘विशेष मोहीम’ साईमत- जळगाव – प्रतिनिधी| प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर तब्बल वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमकांना हटवण्यासाठी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम’ राबवली जाणार आहे. स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमणे थेट जमीनदोस्त केली जातील, अशी कडक चेतावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी दिली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांच्या जागांवर अशी अतिक्रमणे आहेत, त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ​’ग्राउंड झिरो’वरील पाहणीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय…

Read More

साईमत- जळगाव – प्रतिनिधी| फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या जळगावच्या कन्या आणि फलटणच्या सून सौ. काजल रूतूराज भोईटे यांना मुंबईत मानाच्या ‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ (Best Model) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय यशामुळे जळगाव आणि फलटण शहरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ​सौ. काजल भोईटे यांच्या फॅशन क्षेत्रातील निष्ठा, कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या सन्मानामुळे जागतिक स्तरावर एक उदयोन्मुख मॉडेल म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली असून,…

Read More