साईमत -जळगाव- प्रतिनिधी | राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिनांक 7 रोजी शुक्रवार ला जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना भेट देऊन शैक्षणिक वातावरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक दर्जात सुधारणा करण्यावर त्यांनी या दौऱ्यादरम्यान विशेष भर दिला. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त तुषार महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी आणि विजय सरोदे यांच्यासह शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावल व पाळधी येथील शाळांना भेटी: प्रधान सचिवांनी यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा,…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (६ ऑगस्ट) धानोरा येथील सूर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबीराला धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव व अडावद परिसरातील ४५३ हून अधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी या शिबीरात महिला व किशोरवयीन मुलींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप व आरोग्य समुपदेशन करण्यात आले. याशिवाय सर्वांसाठी मोफत दंत व नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची विशेष सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी…
साईमत -रावेर- प्रतिनिधी | तालुक्यातील आमोदा परिसरात बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात रावेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शुक्रवारी धडक कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर संशयित गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडी व सुरे जप्त केले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा परिसरात अवैध कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नियोजनबद्ध जाळे रचून दोन ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मांसाचे नमुने प्रयोगशाळेत; आरोपीवर गुन्हा…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव शहर महानगरपालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक, गतीमान आणि अभ्यासपूर्ण व्हावे या उद्देशाने नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी नाशिक येथे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट आणि शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासकीय कामकाजाची बारकावे, नियमावली आणि तांत्रिक बाबी समजून घेतल्यास महासभेत जनतेचे मूलभूत प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, ही भूमिका डोळ्यांसमोर ठेवून महापौर दीपमाला काळे यांनी या प्रशिक्षणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण शिबीर नियोजित करण्यात आले होते; मात्र…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | हिरोशिमा दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. ६) जळगाव येथील गांधी उद्यानात गांधी रिसर्च फाउंडेशन व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जागतिक शांतता, बंधुता व अहिंसेचा संदेश दृढ करण्याचा आणि मानवी विनाशाची पुनरावृत्ती टाळण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, रामकुमार मंडल, निशा त्यागी आणि गांधी तीर्थचे उदय महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. १०० हून अधिक देश-विदेशातील प्रतिनिधींचा सहभाग शुक्रवार, दि. ७ ऑगस्टपासून गांधी तीर्थ येथे हरिजन…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | तरसोद ते फागणे बायपास महामार्गाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत (Black List) टाकावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तीव्र इशारा दिला आहे. शासकीय निधीचा अपव्यय व नागरिकांच्या जीवाला धोका उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तरसोद-फागणे बायपास महामार्गावर लोहमार्ग क्रॉसिंग असून येथे दररोज अवजड व प्रवासी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. असे असतानाही संबंधित ठेकेदाराने तांत्रिक निकष व करारातील अटी धाब्यावर बसवून अत्यंत दर्जाहीन काम केले आहे. या…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | असोदा–मन्यारखेडा मार्गावरील रेल्वे अंडरपासमधील साचलेले पाणी उपसल्यानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे परिसरातील सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्य झाले असून खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाच्या शेतीकामांचा पुरता बंबार्ट झाला आहे. खासदारांच्या सूचनेनंतर पाणी काढले, पण रस्ता पूर्ववत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वी खासदार स्मिता वाघ यांनी पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पाहणी करताना या अंडरपासमधील पाणी तातडीने उपसण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. प्रशासनाने पाणी उपसून मोकळे केले खरं, पण रस्ता अजूनही बंदच ठेवल्याने शेतकऱ्यांचे हाल कायम आहेत.…
साईमत -भुसावळ – प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तब्बल दोन वर्षे वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह तिघांविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयिताने २०२३ पासून जुलै २०२५ या कालावधीत पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या काळात संशयिताने तिच्याकडून मोठी रक्कम आणि एक मोटारसायकलही उकळली. अखेर संशयिताने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. या संपूर्ण प्रकारात मुख्य संशयिताला सहकार्य केल्याचा आरोप इतर दोन साथीदारांवर…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा शिरसोली जवळील ‘चंबार दडी’ पाझर तलावात पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषिकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा आपल्या काही मित्रांसोबत शामाफायरच्या पाठीमागील चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. यावेळी “मला पोहता येते” असे सांगून तो तलावात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश…
सक्तीने स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा साईमत -धरणगाव प्रतिनिधी | महावितरण कंपनीकडून ग्राहकांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या संमतीशिवाय सक्तीने ‘स्मार्ट वीज मीटर’ बसवले जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धरणगावात महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात तुफान घोषणाबाजी करत परिसरातील नागरिकांनी व शिवसैनिकांनी परिसर परिसर दुमदुमून सोडला. धरणगाव शहर आणि ग्रामीण भागात सध्या जुने वीज मीटर काढून त्याऐवजी डिजिटल स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम महावितरणकडून वेगाने राबवली जात आहे. मात्र, हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले येत असून ही एक प्रकारे सर्वसामान्यांची आर्थिक लूटच आहे, असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी…