साईमत- नशिराबाद – प्रतिनिधी| नशिराबाद-उमाळा रस्त्यावरील भाग्यवर्धन कंपनीकडून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक व प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न आता कमालीचा पेटला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, आता याचा थेट फटका परिसरातील शेतजमिनींनाही बसू लागला आहे. या संतापजनक प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी थेट नशिराबाद नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संशयास्पद भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यावरून पाणी थेट शेताकडे वळवले! काही दिवसांपूर्वी या प्रदूषणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नशिराबाद नगरपरिषद अध्यक्षांनी तात्काळ दखल घेत परिसराची पाहणी केली होती. मात्र, या कारवाईला बगल देण्यासाठी कंपनी प्रशासनाने एक नवी शक्कल लढवली. रस्त्यावर वाहणारे केमिकलयुक्त पाणी दुसऱ्या बाजूला…
Author: Bharati Bharsake
साईमत- फैजपूर – प्रतिनिधी| जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या असहायतेचा फायदा घेत, तिच्याच शेजाऱ्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. आरोपीने वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. महिला पाणी आणण्यासाठी गेली असता, आरोपीने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. या अनपेक्षित प्रसंगामुळे वृद्ध महिला प्रचंड घाबरली होती. घटनेचा धक्का ओसरल्यानंतर…
”मी जे काही करतो, ते फुलप्रूफ करतो!” – एकनाथ शिंदेंचे विरोधकांना थेट ओपन चॅलेंज साईमत- मुंबई- प्रतिनिधी| विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर ठाकरे गटाचे धडाडीचे आमदार आणि मुंबईतील कामगार नेते सचिन अहिर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. महायुतीकडून उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे पक्षात जंगी स्वागत केले. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हण वापरत अत्यंत बोचरा वार केला आहे. ३० जूनचा तोच ‘योगायोग’ आणि शिंदेंचा षटकार! योगायोग म्हणजे ३०…
१ जुलैपासून प्रत्यक्ष वर्गांना होणार सुरुवात साईमत- जळगाव – प्रतिनिधी| शहरातील बालशिक्षण क्षेत्रात आपल्या दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षणासाठी नावलौकिक मिळवलेल्या ‘चावरा वंडरकिड्स’ (नर्सरी, ज्युनिअर के.जी. व सिनिअर के.जी.) या नामांकित संस्थेच्या पंखांचा आता अधिक विस्तार झाला आहे. जळगावकर पालकांची वाढती मागणी आणि चिमुरड्यांना घराच्या जवळच उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या दोन नवीन अत्याधुनिक शाखा शहरात सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य फादर जोबी यांनी दिली. या दोन्ही शाखांमधील प्रत्यक्ष वर्गांना उद्या, बुधवार दि. १ जुलै २०२६ पासून उत्साहात सुरुवात होत आहे. कुठे सुरू झाल्या नवीन शाखा? शाखा १ ली (जुना खेडी रोड परिसर): प्लॉट क्रमांक ०६, गीताई…
सामाजिक कार्यकर्त्याचा थेट लेटरबॉम्ब : कंत्राटदारांचे लाड, कामगारांचे शोषण, दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणि पाणी योजनेत दिरंगाईचा गंभीर आरोप! साईमत -नशिराबाद -प्रतिनिधी | नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या कारभाराविरोधात आता थेट जिल्हाधिकारी दरबारात तक्रार दाखल झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नियमानुसार कार्यकाळ संपूनही खुर्चीला चिकटून राहिलेल्या सोनवणेंची तात्काळ बदली करण्यात यावी आणि त्यांच्या कार्यकाळातील विविध संशयास्पद कामांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जाहीर मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साळी यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या तक्रारीसोबत माहिती अधिकारातून (RTI) मिळालेले धक्कादायक पुरावेही जोडण्यात आले आहेत. एकाच कंत्राटदारावर मेहरबानी का? ‘ते’ आर्थिक कनेक्शन काय? तक्रारदाराने नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनावर…
साईमत-छत्रपती संभाजीनगर- प्रतिनिधी| राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी मोठे स्वरूप प्राप्त झाले. संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीची मोठी एकजूट पाहायला मिळत असून सुमारे ५ हजार शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ’लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्या म्हणाल्या: ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील तब्बल ८० लाख भगिनींना केवळ…
रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत- जळगाव – प्रतिनिधी| राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत… एक सूर…’ हा विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आज (दि. ३० जून) सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्रायोजित, तसेच रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ या संकल्पनेवर आधारित विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते सहभागी शाळांचा गौरव करण्यात आला: दीपमाला काळे (महापौर)…
भयावह प्रकार: जंगलात परिचयाच्या मित्रासमोरच ओढवले क्रौर्य; गुन्ह्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ केला सोशल मीडियावर व्हायरल! साईमत- जामनेर – प्रतिनिधी| जळगाव जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणणारी एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर निर्जन जंगलात सामूहिक बलात्कार (गॅंगरेप) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी या घृणास्पद कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि त्यापैकी एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ समोर येताच जळगाव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून या प्रकरणातील १५ पैकी १४ मुख्य व सह-आरोपींना बेड्या…
भयानक वास्तव: धडक इतकी भीषण की ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे; मध्यरात्री १ वाजता भडगाव तालुक्यातील घटना साईमत-भडगाव- प्रतिनिधी| भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडून अत्यंत आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला एका भरधाव मालवाहू आयशर वाहनाने पाठीमागून काळ बनून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका भाविकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिलांसह १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव परिसरातील काही भाविक आपल्या नातेवाईकांना पंढरपूर वारीसाठी रेल्वे किंवा वाहनात बसवून देण्यासाठी गेले होते. नातेवाईकांना आनंदाने निरोप दिल्यानंतर सर्वजण ट्रॅक्टरने…
विना परवाना व विना बिल ‘क्रॉप बूस्टर’चे वितरण; पाच अधिकाऱ्यांच्या पथकाची धडक कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू साईमत- जळगाव – प्रतिनिधी| कृषी मित्र’ पद भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल करून परीक्षा शुल्क उकळणे आणि विना परवाना खत सदृश्य जैव उत्पादनांचे वितरण केल्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने जळगावातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर थेट धाड टाकून तब्बल २७३ जैव उत्पादनांची पाकिटे जप्त केली आहेत. या प्रकरणी संबंधित संस्था, उत्पादक कंपनी आणि जिल्हा समन्वयकाविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत अधिकृत तक्रार देण्यात आली…