Author: Bharati Bharsake

साईमत -जळगाव -प्रतिनिधी | शहर आणि परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व उघड्यावरील मांस विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक आणि मनपा महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले. पुढील ७ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. ​निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव शहरातील विविध नागरी वस्त्यांमध्ये आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला अत्यंत अस्वच्छ व अनधिकृत रित्या उघड्यावर मांस विक्री सुरू आहे. या दुकानांमधील उरलेले मांसाचे तुकडे, रक्त आणि हाडे रस्त्यावर…

Read More

मावळ (पुणे): मावळमधील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा अपघात झाला नसून, त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याला दरीत ढकलून दिल्याचा प्रकार तपासातून उघड झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ​वाढदिवसाच्या दिवशीच रचला मृत्यूचा खेळ ​मिळालेल्या माहितीनुसार, गहुंजे (मावळ) येथे राहणारा २६ वर्षीय केतन विशाल अग्रवाल हा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता आणि तो स्वतःही याच व्यवसायात कार्यरत होता. गुरुवारी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले…

Read More

​नंदुरबार: नंदुरबार शहरातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय मुलींच्या वस्तीगृहात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या तब्बल २२ विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कथित कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वस्तीगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ​ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल ​मिळालेल्या माहितीनुसार, या वस्तीगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. या संभाषणात विद्यार्थिनींच्या अन्न व पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत धक्कादायक चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे…

Read More

​मुंबई: ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. शिंदे गटात गेलेले नवनवीन खासदार संजय पाटील यांनी केलेल्या ‘बंदुकीच्या’ इशाऱ्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “मी तुझ्या नादाला लागतो चल! शिवसैनिकांना बंदूक दाखवू नकोस, ५० कोटी गिळले ना, मग गप्प बस,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राऊतांनी संजय पाटलांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे. ​५० कोटींचा हिशोब समोर; राऊतांचे गंभीर आरोप नियमित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर पैशांचे गंभीर आरोप केले. “या गद्दारीचा संपूर्ण हिशोब माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे १३ तारखेला १५ कोटी आले,…

Read More

साईमत -​धरणगाव -प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवार, २२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ​लग्नावरून परतताना काळाचा घाला अपघातातील मृत किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव) हे पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून ते आपले वडील बाबूलाल राक्षे यांच्यासह दुचाकीने घरी परतत असताना हा अपघात झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील चेतन भिकन पाटील (वय…

Read More

​सातारा/सांगली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “ज्यांना आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांनी काळजी करू नये. देवाभाऊंकडे (देवेंद्र फडणवीस) दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे,” असे गोरे यांनी म्हटले आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाल्यानंतर सांगलीतील सत्कार समारंभात ते बोलत होते. ​”आम्ही चौघेही आमदार झालो” आपला अनुभव सांगताना मंत्री गोरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतूलबाबा आणि मनोजदादा अशा चौघांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही चौघेही आमदार झालो. प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आजचा दिवस प्रचंड गदारोळाचा ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि पुरवणी मागण्या सादर झाल्यानंतर, आज विरोधक विविध आक्रमक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. ​या मुद्द्यांवरून सभागृहात खडाजंगीची शक्यता ​शेतकरी आणि दुष्काळाचा प्रश्न: राज्यातील दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न आणि वीजटंचाई यावरून विरोधक महायुती सरकारला घेरतील. ​राजकीय घडामोडी व ‘ऑपरेशन टायगर’: शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष, सहा खासदारांच्या पक्षांतराचा गाजणारा मुद्दा आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ​पहिल्याच दिवशी मोठी घोषणा: शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी २०,५५२ कोटी! ​पहिल्या दिवशी राज्य सरकारने दोन्ही…

Read More

साईमत -जळगाव -प्रतिनिधी | शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जळगाव पोलीस यंत्रणा अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या कडक आदेशानुसार, शहरात एकाच वेळी भव्य धडक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.​या मोहिमेत पोलिसांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर थेट प्रहार केला आहे. ​उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर गुन्हा ​वाईन शॉप, मोकळी मैदाने आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर (स्टॉल्स) उघड्यावर दारू पिणाऱ्यांची कसून तपासणी केली जात असून त्यांच्यावर थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत. ​महामार्गावरील (हायवे) परवाना नसलेली हॉटेल्स आणि धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांवर आणि पाजणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा…

Read More

साईमत -जळगाव -प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज जळगाव तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीला अचानक भेट देत प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेतली. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामकाजाचा लेखाजोखा घेतला. नागरिकांना महाऑनलाईनच्या सेवा वेळेत न मिळाल्यास किंवा शासकीय दप्तरामध्ये त्रुटी आढळल्यास गय केली जाणार नाही, असा थेट इशाराच ‘सीईओ’ नायर यांनी दिला. ​या दौऱ्याची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून झाली. केवळ औपचारिकता म्हणून झाडे लावू नका, तर त्याचे जिवंत संगोपन करा, असा सल्ला त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. ​पोषण आहाराच्या गुणवत्तेत तडजोड नको; अंगणवाडीत ‘ऑन द स्पॉट’…

Read More

​जळगाव: इराण-अमेरिका वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘होर्मुज स्ट्रेट’ बंद झाल्यामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) कनेक्शनबाबत काही कडक नियम लागू केले आहेत. सध्या सोशल मीडियावर “३० जून २०२६ नंतर ज्या भागात पीएनजी पाईपलाईन आहे, तिथले एलपीजी सिलेंडर कनेक्शन थेट बंद केले जातील,” असा दावा वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या दाव्यामागचे नेमके वास्तव काय आहे आणि सरकारचे नवे नियम काय सांगतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. ​३० जूनच्या डेडलाईनचे ‘हे’ आहे खरे सत्य! ​सोशल मीडियावर केला जाणारा एलपीजी कनेक्शन कापण्याचा दावा पूर्णपणे खरा…

Read More