Author: Sharad Bhalerao

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आदिवासी सेलच्या तालुकाध्यक्षपदी हिवऱ्याचे मुबारक गुलशेर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी रा.काँ.चे नेते आ.एकनाथराव खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधवांनी रा.काँ.मध्ये प्रवेश केला. यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी त्याचठिकाणी जोंधनखेडा येथील इतबार रमजान तडवी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना ॲड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी हिवऱ्याचे मुबारक गुलशेर तडवी, तालुका उपाध्यक्षपदी विनोद उस्मान तडवी, शेरू नजीर तडवी, रुबाब राजखा तडवी, सरचिटणीसपदी अशरफ गुलाब तडवी, सलीम सुजात, अबूजर नजीर, रमजान गुलाब, समीर इतबार,…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी येथील श्री सावता माळी मंगल कार्यालयात माळी समाज पंच मंडळातर्फे आयोजित अनिष्ट चालीरितीबद्दल नुकतीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यात एकूण आठ अनिष्ट चालीरिती सादर केली असता सर्वसाधारण सभेने त्या मंजूर करुन त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्य विश्‍वस्त प्रल्हाद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी माळी समाजाचे माजी अध्यक्ष संजय महाजन, पद्माकर महाजन, प्रभाकर महाजन, माजी नगर सेविका शकुंतला महाजन, छाया महाजन, बी.आर.महाजन यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत साखरपुडा हा वेळेवर दुपारी एक वाजेपर्यंत करावा, वधू-वर यांनी कपडे चढवून मंडपात बसावे, वट भरण कार्यक्रम घरगुती स्वरुपात करावा, लग्नाच्या आधी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय गेल्या २९ फेब्रुवारी घेतला होता. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजार ४७१ शेतकऱ्यांना जवळपास १३३ कोटी १९ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रारंभ आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. येत्या ४८ तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होईल. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान वाढविण्यात आले आहे. त्यात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी स्पर्धात्मक युगाचा विचार केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी गाव तेथे वाचनालयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज आहे. त्यासाठी कामगार मंडळाचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष विचारांना कृतीची जोड देण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन ॲड.राहुल वाकलकर यांनी केले. महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ‘स्पर्धा परीक्षा काळाजी गरज’ विषयावर व्याख्यान तथा ‘स्वामी विवेकानंद आणि आजची तरुणाई’ विषयावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केली होती. याप्रसंगी निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख श्री.वाघारे, बी.टी.पाटील, राजू कुलकर्णी आदी उपस्थित होते.…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील भाविकांचे श्रद्धास्थान प्राचीन आणि हेमाडपंथी तपेश्‍वर मंदिरास पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, जितेंद्र पाटील, लोहारा गटाचे पालक पदाधिकारी सुहास पाटील, शरद सोनार, नथू गीते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांच्या मागणी आणि सततच्या पाठपुराव्यामुळे ना.गिरीष महाजन यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करत ११ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत. लोहारा येथील तपेश्‍वर मंदिराचे सुशोभीकरण आणि विकास व्हावा, ही ग्रामस्थांसह भाविकांची अनेक दिवसांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी धार्मिकतेसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्हासह मानपत्र असे आहे. मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व क्रीडामंत्री संजय बनसोडे, आ.संजय सावकारे, सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि सहसचिव दिलीप बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेतर्फे धार्मिकतेबरोबरच नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबविले जातात. त्यात दरवर्षी हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या भवनात शिवसेना उबाठाने ‘जनाधिकार जनता दरबार’ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर त्यावर पर्याय काढून शेतकऱ्यांचे कापसाचे बुडालेले पैसे मिळवून दिले आहे. शिवसेनेच्या जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमाला ललित ज्ञानदेव पाटील (ढोण, रा. वाकोडी) यांनी हजर राहून त्यांची व्यथा मांडली. त्यांनी २३ जुलै २०२३ रोजी निना दिगंबर घुले (रा. भालेगाव, रन) यांना पंधरा क्विंटल साठ किलो कापूस विकला होता. हा व्यवहार वायदा बाजाराप्रमाणे असल्याने कुठल्याही प्रकारचे लेखी स्वरूप यास नव्हते. कालांतराने कुप्रसिद्ध जग्गू डॉनचे प्रकरण बाहेर आले. निना घुले यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी ५० हजार रुपये दिले. उर्वरित…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मतदारांमध्ये जागृती हवी, मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. स्थानिक जनता कला, वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाअतंर्गत प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच डेमोक्रोसी रूमची स्थापना करण्यात आली. या विभागामार्फत महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणीचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. उपक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.आर. डी. इंगोले (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) हे मतदान संदर्भात काम पाहत आहेत. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये गुरुवारी, १४ मार्च रोजी आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. किरण खेट्टे उपस्थित होत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध चटपटीत, चमचमीत, चविष्ट पदार्थांचे आणि विशेष स्वच्छता राखून स्टॉल लावण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनी पदार्थांची चव घेतली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे व तयार केलेल्या पदार्थाची रक्कमची किंमत कळावी हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता, असे शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन उपशिक्षिका सिमरन तडवी, कोमल बडगुजर तर…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबानी स्वत: खंबीर होऊन आपल्या पुढच्या पिढीतील लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबावरच हे सावट दूर करणे आवश्‍यक आहे. आपल्यासोबत आम्ही आहोत, निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ महिला आणि पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील २१ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे चार लाख २० हजाराचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.…

Read More