साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबानी स्वत: खंबीर होऊन आपल्या पुढच्या पिढीतील लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबावरच हे सावट दूर करणे आवश्यक आहे. आपल्यासोबत आम्ही आहोत, निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ महिला आणि पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील २१ व्यक्तींना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे चार लाख २० हजाराचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्याबाबतचे धनादेश पात्र उपस्थित लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागाला दिले. धरणगाव नगरपालिका सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, सी. बी. देवराज, महसूल सहायक गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, विजय महाजन, वासुदेव चौधरी, प्रिया इंगळे, भारती चौधरी, पुष्पा पाटील, रवींद्र कंखरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविकात नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी योजनेची माहिती विशद केली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कंखरे तर आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मानले.
तालुक्यातील पात्र २१ लाभार्थ्यांना लाभ
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी असे आम्रपाली साळुंखे (पाळधी खु.), कोकिळाबाई कुंभार, मंगलाबाई जोशी, (पाळधी बु.), संगीता मोरे, रंजनाबाई पारधी, कल्पना मोरे, (धरणगाव), मंगला मोरे, यमुनाबाई मोरे, (साळवा), उषाबाई पाटील (हिंगोणे बु.), सुमन मोरे (खर्दे बु.), रेखा पाटील (कल्याणे खु.), अलकाबाई पाटील (आव्हाणी), भारती शिरसाट, पूनम मिस्तरी (वाघळुद खु.), अलकाबाई पाटील (धार), ललिता पाटील (भवरखेडा), मिनाबाई गोधळे (गारखेडा), जयश्री खैरनार (शेरी), सखुबाई भिल (दोनगाव बु.), देवकाबाई भिल (कल्याणे बु.), संगीता कोळी (रोटवद), असे पात्र लाभार्थी आहेत. त्यातील उपस्थितांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.