मलकापूर महाविद्यालयात मतदानाविषयी विद्यार्थ्यांना धडे

0
5

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

मतदारांमध्ये जागृती हवी, मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. स्थानिक जनता कला, वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाअतंर्गत प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच डेमोक्रोसी रूमची स्थापना करण्यात आली. या विभागामार्फत महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणीचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. उपक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.आर. डी. इंगोले (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) हे मतदान संदर्भात काम पाहत आहेत.

निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा त्याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते, याबाबत प्रा.डॉ. आर.डी. इंगोले यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतात. त्यात मतदार जनजागृतीपर रॅली, प्रभात फेरी, विविध स्वरूपाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यात येतो.

मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरूपाची जागृती घडवून आणता येईल, असे संबोधन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here