माळी समाजात आठ अनिष्ट चालीरिती बंदचा घेतला निर्णय

0
10

साईमत, रावेर : प्रतिनिधी

येथील श्री सावता माळी मंगल कार्यालयात माळी समाज पंच मंडळातर्फे आयोजित अनिष्ट चालीरितीबद्दल नुकतीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यात एकूण आठ अनिष्ट चालीरिती सादर केली असता सर्वसाधारण सभेने त्या मंजूर करुन त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्य विश्‍वस्त प्रल्हाद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी माळी समाजाचे माजी अध्यक्ष संजय महाजन, पद्माकर महाजन, प्रभाकर महाजन, माजी नगर सेविका शकुंतला महाजन, छाया महाजन, बी.आर.महाजन यांच्यासह माळी समाज बांधव उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेत साखरपुडा हा वेळेवर दुपारी एक वाजेपर्यंत करावा, वधू-वर यांनी कपडे चढवून मंडपात बसावे, वट भरण कार्यक्रम घरगुती स्वरुपात करावा, लग्नाच्या आधी होणारे प्रे-विडींग बंद करावे, लग्न वरातीत महिलांनी सामूहिक किवा व्यक्तिक नृत्य करू नये, लग्न हे वेळेवर लावण्यात यावे, अंत्ययात्रा ही वेळेवर काढण्यात यावी, लग्नातील आहेर देणे-घेणे बंद करावे, हळदीच्या दिवशी आणि लग्नात डीजे लावू नये, अशा आठ अनिष्ट चालीरिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यशस्वीतेसाठी अध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष उमेश महाजन, सचिव विनोद पाटील, सहसचिव तुषार मानकर, सदस्य सुकलाल महाजन, हिरामण महाजन, प्रशांत पाटील, प्रकाश महाजन, प्रतीक महाजन, नितीन महाजन, पंडित महाजन, प्रल्हाद पाटील, नामदेव महाजन, दिवाकर महाजन, संतोष महाजन, संतोष पाटील, वैभव देशमुख, रवी महाजन, रमेश महाजन आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार सचिव विनोद पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here