मुक्ताईनगरला रा.काँ.आदिवासी सेलच्या तालुकाध्यपदी मुबारक तडवी

0
1

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आदिवासी सेलच्या तालुकाध्यक्षपदी हिवऱ्याचे मुबारक गुलशेर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी रा.काँ.चे नेते आ.एकनाथराव खडसे आणि महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधवांनी रा.काँ.मध्ये प्रवेश केला. यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी त्याचठिकाणी जोंधनखेडा येथील इतबार रमजान तडवी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना ॲड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी हिवऱ्याचे मुबारक गुलशेर तडवी, तालुका उपाध्यक्षपदी विनोद उस्मान तडवी, शेरू नजीर तडवी, रुबाब राजखा तडवी, सरचिटणीसपदी अशरफ गुलाब तडवी, सलीम सुजात, अबूजर नजीर, रमजान गुलाब, समीर इतबार, अय्युब हयात, अयुब हमान, अहमद चांदखा, दरबार दालरखा, गुलझार कचरू यांची संघटकपदी, गुलाब चांदखा, जहांगीर बहादूर यांची ज्येष्ठ सल्लागार तर तालुका कार्यकारिणी सदस्यांमध्ये हुसेन इब्राहिम, अल्ताफ नजीर, रफिक मुनाफ, लतीफ फकिरा, जावेद असलम, अरिफ रमजान, इराफन सीताब, अस्लम अन्वर, अफजल मुजात, अस्लम रहीम, शरीफ जांबीर, साबीर तडवी, असिक तडवी, जोंधनखेडा शाखाध्यक्ष म्हणून मुजाफ्फर भिकनखॉ यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी ॲड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, श्री.पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here