साईमत, यावल : प्रतिनिधी
येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये गुरुवारी, १४ मार्च रोजी आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. किरण खेट्टे उपस्थित होत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध चटपटीत, चमचमीत, चविष्ट पदार्थांचे आणि विशेष स्वच्छता राखून स्टॉल लावण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनी पदार्थांची चव घेतली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे व तयार केलेल्या पदार्थाची रक्कमची किंमत कळावी हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता, असे शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन उपशिक्षिका सिमरन तडवी, कोमल बडगुजर तर आभार कविता पाटील यांनी मानले.