शिवसेना उबाठाच्या ‘जनाधिकार जनता दरबाराने’ शेतकऱ्यांचे मिळवून दिले कापसाचे पैसे

0
43

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या भवनात शिवसेना उबाठाने ‘जनाधिकार जनता दरबार’ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर त्यावर पर्याय काढून शेतकऱ्यांचे कापसाचे बुडालेले पैसे मिळवून दिले आहे.

शिवसेनेच्या जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमाला ललित ज्ञानदेव पाटील (ढोण, रा. वाकोडी) यांनी हजर राहून त्यांची व्यथा मांडली. त्यांनी २३ जुलै २०२३ रोजी निना दिगंबर घुले (रा. भालेगाव, रन) यांना पंधरा क्विंटल साठ किलो कापूस विकला होता. हा व्यवहार वायदा बाजाराप्रमाणे असल्याने कुठल्याही प्रकारचे लेखी स्वरूप यास नव्हते. कालांतराने कुप्रसिद्ध जग्गू डॉनचे प्रकरण बाहेर आले. निना घुले यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी ५० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम विसरून जाण्याबाबत ललित यांना सांगितले. व्यवहाराचे कुठेही नोंद नसल्याने हतबल झालेल्या ललित पाटील यांना शिवसेनेचा जनाधिकार जनता दरबार हा कार्यक्रम एक आशेचा किरण वाटला. त्यांनी जनता दरबार कार्यक्रमाला हजर राहून लेखी स्वरूपात तक्रार दिली. कार्यक्रमात झालेली आपबिती तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांना मुद्देसूद सांगितली. शिवसेनेच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन करुन त्यांना पैसे परत मिळून देण्याबाबत तालुकाप्रमुख यांनी ग्वाही दिली. तसेच त्यांना आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे घेऊन गेले. प्रकरणाची तीव्रता अधिकाऱ्यांनी समजावली. जिल्हाप्रमुख वसंतराव भोजणे यांच्या मार्गदर्शनात समस्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठले. प्रकरणाची नाजूकता पाहता घुले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याआधी त्यांना एक संधी देण्याबाबत सांगितले. ठाणेदार अनिल गोपाळ यांनीही याप्रकरणी सहकार्य केले. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून पीडित शेतकऱ्याला राहिलेली मुद्दल घुले यांच्याकडून परत मिळवून दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख वसंतराव भोजणे, शिवसेना मलकापूर तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, विधानसभा संघटक राजूसिंग राजपूत, शहर प्रमुख गजानन ठोसर, पत्रकार तथा शहर उपप्रमुख कृष्णा मेहसरे, रविभाऊ गव्हाळे, राजेंद्र काजळे, अर्जुन कुयटे, स्वप्निल लोड, समद कुरेशी, इम्रान लकी, अमित राजपूत, यासीन कुरेशी, दीपक कोथळकर, अफसर खान साहेब खान, सत्तार शाह यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here