लोहाऱ्यातील तपेश्‍वर मंदिराला अडीच कोटींच्या निधीला मंजुरी

0
11

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील भाविकांचे श्रद्धास्थान प्राचीन आणि हेमाडपंथी तपेश्‍वर मंदिरास पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, जितेंद्र पाटील, लोहारा गटाचे पालक पदाधिकारी सुहास पाटील, शरद सोनार, नथू गीते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांच्या मागणी आणि सततच्या पाठपुराव्यामुळे ना.गिरीष महाजन यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करत ११ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत.

लोहारा येथील तपेश्‍वर मंदिराचे सुशोभीकरण आणि विकास व्हावा, ही ग्रामस्थांसह भाविकांची अनेक दिवसांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी ना.गिरीष महाजन यांना गेल्या १० ऑगस्ट २०२३ रोजी पत्र देऊन मागणी केली होती. या कामाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ना.गिरीश महाजन यांनी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लोहारा ग्रामस्थांसह भाविकांनी आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here