Author: Saimat

साईमत : नवापूर : प्रतिनिधी नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य विनोदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक एस.आर.पहुरकर यांनी मार्गदर्शन केले. त्या निमित्त वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत नाटिका तसेच गीत गायन स्पर्धचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक आर.के.पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक हरीश पाटील होते. मान्यवरांनी सरस्वती मातेची पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत श्लोक, गीत, वकृत्व, संस्कृत नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक सिद्धेश्वर शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आधार आहे.…

Read More

साईमत : नंदुरबार: प्रतिनिधी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाच्या (एस.एस.बी.) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी युवक-युवतींसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात (नाशिक रोड) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी कळविले आहे. शासनामार्फत राज्यातील युवक-युतींसाठी ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत एसएसबी प्रशिक्षण क्र.५४ चे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित महिला मंडळ जळगाव याच्या वतीने श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सांस्कृतिक सभागृहात श्रावण सखी व मंगळागौर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिक्षक दिनानिमित्त समाजातील २१ गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मंगळागौर, कानबाई गाणे आदींवर बहारदार नृत्य केले कार्यक्रमातून प्रथम विजेते गोणाई महिला मंडळ, द्वितीय विजेते सावित्रीबाई महिला मंडळ, तिसरे पारितोषिक मनकर्णिका मंडळ तर उत्तेजनार्थ देवरे ग्रुप यांनी पटकावले. सखी क्वीन अंतर्गत तेजस्विनी कापुरे यांनी प्रथम मानाचा मुकुट मिळाला, द्वितीय क्रमांक दीपिका शिंपी, तृतीय क्रमांक वैशालीताई शिंपी यांना मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्षा अंजली बाविस्कर होत्या. महिला…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयात “विज्ञान” विभागातर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “पाणी परीक्षण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण विभागातील संशोधक मयूरी पाटील, अधिव्याख्यात्या अस्मिता जाधव यांची उपस्थिती होती. यांच्यासोबत व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात मयूरी पाटील यांनी संगितले की, शेती, कारखाने, पिण्याचे पाणी यासाठी वापरात येणार्‍या पाण्यात कोणकोणते घटक असतात. या पाण्याचे परीक्षण कश्याप्रकारे केले जाते. यात पाण्याचा रंग, वास, गढूळपणा याविषयी सविस्तर माहिती त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे विद्यार्थ्यांना दिली…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाने अंतिम सामन्यात अनुभूती शाळेचा 3-0 असा पराभव करत विजय मिळवत पुढे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 14 ते 19 वर्षातील तालुकास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 या सोमवार, दि.११ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या संघातील खेळाडू चि.देवेश चौधरी, चि.संकेत पाटील आणि चि.रुद्र पाटील यांनी अष्टपैलू खेळ करीत संघास विजय मिळवून दिला. विजेत्या संघाचे आणि…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्यासाठी कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विभागातंर्गत एआरटी केंद्र येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश एस. पी. सय्यद, समाज सेविका समांतर विधी सेवा सहा. भारती कुमावत, दिपशिखा साखला, माधुरी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी-संजय पहूरकर, ART वैद्यकीय अधिकारी अनुपमा जावळे आदी उपस्थित होते. न्यायाधिश एस. पी. सय्यद यांनी एचआयव्ही सह जीवन जगणा-या लोकांना त्याना काही कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागाकडे अर्ज करण्याबाबत आवाहन केले. जिल्हा विधी…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने जळगाव शहरातील चार महनीय व्यक्तिमत्त्वाला जळगाव रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यात मुस्लिम समाजाचे डॉ. अब्दुल गफार मलिक यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन महापौर जयश्री महाजन यांना लेखी पत्र देऊन त्यांचे आभार मानले. जळगाव शहरात मुस्लिम समाजाचे अनेक व्यक्तिमत्व असताना सुद्धा महानगरपालिकेने मुस्लिम समाजातील खरा व प्रामाणिक तसेच ज्याची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्याच्या जवळ असलेली नीतिमत्ता, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, गरिबी जाणणारा, समाजकार्यात आल्यावर आपले इतर उद्योगधंदे बंद करून प्रामाणिक कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात स्वकष्टाने कार्यरत असणारे…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथिल गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना करत दिनांक ११ ते १३ संप्टे पर्यंत इंडक्शन प्रोग्राम आयोजीत करण्यात आला असून थाटात उदघाटन करण्यात आले. प्रथम दिवशी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग पाटील मुख्य अतिथी, तर गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्राध्यापक दीपक झांबरे, अभियांत्रिकी, अधिष्ठाता प्राध्यापक हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्राध्यापक अतुल बर्‍हाटे सह सर्व विभाग प्रमुख उपस्थीतीत गणेश वंदना व सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रथम सत्रात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ.पराग पाटील यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध शृंगार साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव, दुसऱ्या सोमवारी दिव्यांचा महादेव, तिसऱ्या सोमवारी रांगोळी पासून शिवलिंग थ्रीडी बनविण्यात आले आणि चौथ्या सोमवारी सप्त धान्य पासून महाकलेश्वर चे शिवलिंग बनविले आहे. त्यात धान्याची सामग्री अशी, 51 किलो गहू, तांदूळ, हरिवे मूग, उडीद, चणा डाळ, ज्वारी, मसूर डाळ या धान्यापासून शिवलिंगाची आरास साकारण्यास 2 तासाचा अवधी लागला. ही शिवलिंगाची आरास मानव सेवा शाळेतील कला शिक्षक सुनील दाभाडे सर यांनी आपली कला साकारली आणि सर्व शिवभक्त यांनी मदत दिली.सुनिल दाभाडे यांचे अभिनंदन केले.

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी मू. जे. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त जनजागृती पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. रागिब अहमद यांनी व्याख्यानात आत्महत्यांचे कारणे मीमांसा विषद केली. 2018 ते 2022 वर्षात जळगाव जिल्ह्यात 2975 इतक्या आत्महत्या झाल्या ही खूप गांभीर्याची बाब असून त्यांवर उपाययोजना उभी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रागिब अहमद यांनी सांगितले की, आज आपण सामाजिक बांधिलकी पासून दूर गेलो, कौटुंबिक संस्था उध्वस्त होत गेल्या, मित्रा पासून दूर जात आहे, व्यक्ती विभक्त कुटुंब पद्धतीत वावरत आहेत व स्वतः कुटुंबापासून सुद्धा दूर जात आहे, त्यामुळे त्याच्या भावनां व्यक्त होत नाही किंवा भावना व्यक्त करण्यासाठी…

Read More