Author: Saimat

साईमत : जळगाव : प्रतिनिधी निर्भेळ निकोप आणि डोळस श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक गणेश मंडळाकडून अनुभवास येणेसाठी गणरायांचा मंगलमय सण शांततेत इको फ्रेंडली साजरा करत पोलीस खाते, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता आणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते तेच आपण विसरत आहोत. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे व पर्यावरणाची होणारी हानी याचा विचार स्वतः करावा. प्रत्येकाला प्लास्टर ऑफ पॅरिस आणि थर्माकोल यामुळे पर्यावरणाची होणाऱ्या नुकसानाची माहिती आहे. मग ती चूक सातत्याने दरवर्षी केली जाते त्यात बदल व्हावा तसेच उत्साहाच्या भरात…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव शहर महानगरपालिकेची मुदत संपली असून आता सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी शहरातील रचना कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून पती व पत्नीला धारदार वस्तून मारहाण करत जखमी करणाऱ्या सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी कांचन नगर परिसरातून ताब्यात घेतले. याबाबत माहिती अशी की, गोपाल मधुकर चौधरी (वय-४८) रा. दत्त मंदिर जवळ, रचना कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बी.जे.मार्केट येथे लोटगाडीवर चिकन विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड दोन्ही रा. कांचन नगर, तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा.…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात कविता वाचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार करतील. गायन सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो. सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व शासकीय विभागानी क्षेत्रीय स्तरावर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. महाबळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभागाच्या विविध विषय समित्यांच्या जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस.लोखंडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे विविध विभागातील विभाग प्रमुख,…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर २०२३ निमित्त ऑनलाईन ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ स्पर्धा निसर्गमित्र जळगाव तर्फे आयोजित केली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. भारतात ५ सप्टेंबर २०२० पासून सप्टेंबर महिना हा ‘महा फुलपाखरू महिना ‘म्हणून साजरा करण्यात येतआहे. फुलपाखरे ही उत्तम ‘बायो इंडिकेटर’ समजली जातात. त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही निसर्गमित्र जळगाव तर्फे १५ सप्टेंबर रोजी ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ प्रसारीत करीत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. प्रश्नमंजुषा ही मराठी व इंग्रजीत सोडवता…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे शालेय पोषण पंधरवडा निमित्त तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने तृणधान्यांपासून नाविन्यपूर्ण अशा पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे सादरीकरण केले . सदर स्पर्धेत गव्हाची खीर , भगरीची इडली , गव्हाचा पुलाव ,बाजरीचे आप्पे, ज्वारीची चकली , नाचणी चा चॉकलेट केक ,उकडीचे मोदक आदी पदार्थ पालकांनी खूप उत्कृष्टरित्या या ठिकाणी बनवून सादर केले. त्यात सविता पाटील (ज्वारीची चकली ,केक प्रथम क्रमांक) , युगा सोनार (नाचणीचे लाडू द्वितीय) , शीतल पोतदार ( डिस्को भाकरी तृतीय ) ,…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे कार्यक्रमाचे सादरीकरण आज सायंकाळी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना शशिकांत वडोदकर, निवेदन शशिकांत वडोदकर व ईशा वडोदकर, नेपथ्य प्रा. मिलन भामरे आणि पियुष बडगुजर, गायक मयुरी हरीमकर, वैशाली शिरसाळे, कपिल शिंगाने, अक्षय गजभिये, रितेश भोई, साथसंगत कीबोर्ड गौरव काळंगे, ऑक्टोपॅड कैलास निकम ,बासरी लक्ष्मण राजपूत, तबला देवेंद्र गुरव, ढोलक कृष्णा सोनवणे आदी. कार्यक्रम स्थळ जुना कॉन्फरन्स हॉल मूळजी जेठा महाविद्यालय शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता सदर कार्यक्रमाला उपस्थितीचे…

Read More

साईमत  जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे १४ ते १९ वर्षातील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाचा अंतिम सामन्यात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ संघाशी अगदी अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या काही क्षणात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यांनी गोल केला. यात कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाचा संघ उपविजयी ठरला. स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडु म्हणून आपल्या विद्यालयाच्या चि.रत्नदीप अरविंद सोनवणे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी यांच्या सहकार्याने गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत प्रकल्प प्रमुख अभिश्री चव्हाण यांनी प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. 85 विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा आविष्कार घडवीत गणेशाची विविध रूपे साकार केली. सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेल्या मेक्सिको येथील विक्टर बाल्को व फ्रान्स येथील पियर मारी या विद्यार्थ्यांनी देखील कार्यशाळेत सहभागी होत तन्मयतेने बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेचा शुभारंभ रोटरी…

Read More