भारतीय सैन्यदलात भरतीसाठी परिक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

0
2

साईमत : नंदुरबार: प्रतिनिधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाच्या (एस.एस.बी.) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी युवक-युवतींसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात (नाशिक रोड) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी कळविले आहे.

शासनामार्फत राज्यातील युवक-युतींसाठी ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत एसएसबी प्रशिक्षण क्र.५४ चे आयोजन करण्यात आले असून प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस जातांना एसएसबी प्रशिक्षण क्र. ५४ चे शिफारसपत्र व परिपूर्ण भरलेले परिशिष्ट दोन प्रतीत सादर करावे लागेल. सदर शिफारसपत्र व परिशिष्ट सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरील एसएसबी प्रशिक्षण क्र.५४ अथवा व्हॉटसॲप क्रमांक 9156073306 यावर एसएसबी ५४ हा संदेश पाठवून उपलब्ध करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here