शानभाग विदयालयात ‘ पाणी परीक्षण’ विषयावर मार्गदर्शन

0
4

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयात “विज्ञान” विभागातर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “पाणी परीक्षण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण विभागातील संशोधक मयूरी पाटील, अधिव्याख्यात्या अस्मिता जाधव यांची उपस्थिती होती. यांच्यासोबत व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात मयूरी पाटील यांनी संगितले की, शेती, कारखाने, पिण्याचे पाणी यासाठी वापरात येणार्‍या पाण्यात कोणकोणते घटक असतात. या पाण्याचे परीक्षण कश्याप्रकारे केले जाते. यात पाण्याचा रंग, वास, गढूळपणा याविषयी सविस्तर माहिती त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे विद्यार्थ्यांना दिली तसेच TDS, Ph, DO, BOD आणि COD या संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाव्दारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. पाण्याची रचना कशी असते, पाणी बचतीसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्या या संदर्भात मार्गदर्शन केले.

या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख उमेश इंगळे यांनी आणि आभार प्रदर्शन अनिल धामणे यांनी केले. यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख यांच्यासह शालेय परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here