श्री शिवाजी हायस्कूल मध्ये संस्कृत दिनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात

0
1

साईमत : नवापूर : प्रतिनिधी

नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य विनोदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक एस.आर.पहुरकर यांनी मार्गदर्शन केले. त्या निमित्त वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत नाटिका तसेच गीत गायन स्पर्धचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक आर.के.पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक हरीश पाटील होते. मान्यवरांनी सरस्वती मातेची पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत श्लोक, गीत, वकृत्व, संस्कृत नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक सिद्धेश्वर शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आधार आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करायचे असेल तर संस्कृत भाषेचा अभ्यास अनिवार्य आहे . विविध स्पर्धांचे परीक्षण किरण चौधरी व विद्या काळे यांनी केले. आर‌.के.पाटील यांनी प्राचीन काळापासून संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट करुन आज ही ते कायम असल्याचे सांगून संस्कृत दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. संस्कृत दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी हेमंत पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा कुवर व कृपा पाटील या विद्यार्थीनीनी केले तर आभार डॉली पाटील ने मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षकेत्तर बंधु भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here