साईमत : जळगाव : प्रतिनिधी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला गव्हर्नर आशा वेणूगोपाल (नाशिक) यांनी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलला अधिकृत क्लब भेट दिली. गणपती नगरातील डॉ.जी. डी. बेंडाळे वेल्फेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात रोटरी सेंट्रलच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसमवेत त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल रवींद्र शिरुडे, अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आशा वेणूगोपाल यांनी सेवा प्रकल्प राबवताना गरज तिथेच कार्य करावे असे सांगून आगामी काळात धूर मुक्त चुली, नवजात बाळांच्या पायाची समस्या आणि वाहतूक पोलिसांसाठी तणावमुक्ती या विषयांवर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश चौधरी संपादित क्लब…
Author: Saimat
साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या प्रांगणात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला की, आज दिवसभर हिंदी भाषा बोलायची. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर , उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम व हिंदी विभागातील संगीता पाटील , नीता पाटील , दिपाली झोपे, रोहिणी निकुंभ , वैशाली भदाणे , प्रज्ञा राणे , जेष्ठ मार्गदर्शक एस.डी.भिरूड उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी दिना निमित्य भाषण,गीत ,कविता,नृत्य,सामुहिक गीत सादर केले.शाळेतील विद्यार्थी यश जाधव याने हिंदी भाषेचे महत्व विषद केले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी इमामी, हिंदुस्थान युनीलिव्हर व इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे नाव वापरून हुबेहूब नकलीकरण करून तसेच उत्पादन तयार करणाऱ्या जळगावातील दोन भामट्यांना मुंबईतील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेत आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. सिध्देश सुभाष शिर्के (वय-३१ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) हे नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड, शाखा गोरेगाव इस्ट, मुंबई येथे फिल्ड ऑफिसर म्हणून कर्तव्यास आहे. त्यांना इमामी लिमिटेड, हेलिओन युके लिमिटेड, हिंदुस्थान युनिलिव्हर, रेकीट बेनेकीसर, साबळे-वाघिरे कंपनी या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत तयार होणा-या उत्पादनासारखे बनावटीकरण करून विकणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार दिले…
साईमत जळगाव प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भावाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे या तरूणाचा चाकू भोसकून प्रतिष्ठित मु. जे. महाविद्यालयात सन २०१९ साली निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात किरण अशोक हटकर (वय-२४, रा. नेहरू नगर, जळगाव) याला बुधवारी १३ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती बी.एस. वावरे यांनी ठोठावली. तर त्याच्यासोबतचे ५ जण निर्दोष सुटले आहेत. याबाबत माहिती अशी की, रोहित मधुकर सपकाळे रा. आसोदा, ता.जि.जळगाव हा २९ जून २०१९ रोजी मु.जे.महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये आला होता. इच्छाराम पुंडलिक वाघोदे (वय २२, रा.समतानगर) याच्या गाडीला मयत मुकेशचा लहान भाऊ रोहितचा दुचाकी पार्कींग करताना धक्का लागला. त्यावरून…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतून आठ महिन्यांपुर्वी चोरलेली दुचाकी विक्रीसाठी आलेल्या संशयिताला जिल्हा पेठ पोलीसांनी बुधवारी तांबापूर परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. गौरव अशोक मोटवाणी रा. जालना असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी (क्र. एमएच.१९, सीएच ३१४३) ही १६ जानेवारी २०२३ रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. याप्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून बुधवारी १३ सप्टेंबर रोजी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाळेतील उपयोजित भूविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस.एन.पाटील यांची “एससोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजीस्टस (जिओफोरम) महाराष्ट्र” चे उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. ही संघटना व्यावसायिक आणि वैज्ञानिक मंच आहे ज्यामध्ये भूविज्ञान, अभियांत्रिकी भूविज्ञान आणि भूजल क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे खानदेशातून जिओफोरमचे पहिले उपाध्यक्ष होण्याचा मान त्याना प्राप्त झाला आहे ते इंडियन सोसायटी ऑफ इंजिनिअरींग जिऑलॉजीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम पाहत आहेत. भूशास्त्र विषयात गेल्या ३३ वर्षापासून संशोधन आणि अध्यापनाचे काम ते करीत आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे व…
साईमत जळगाव प्रतिनिधी नंदिनीबाई ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. १३ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदा व नंदिनीबाई जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला निबंधासाठी हिंदी रोजी रोटी का जरिया व संत कबीर सच्चे समाज सुधारक हे विषय होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य सी. एस. पाटील, उपप्राचार्य एस. एस. नेमाडे, समन्वयक प्रा.आर .डी .वराडे, प्रा. डी. यू राठोड, प्रा.डी .एम .बारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा व्ही एम जोगी यांनी केले तर हिंदी दिना विषयी प्रा. स्वाती पाटील…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील पालकांसाठी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बनवण्याची स्पर्धा दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जवळ जवळ 70 पालकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सुरवातीला श्री गणेश व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रवीण सोनावणे, समंवयिका अनघा सागडे, व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पालकांनी अतिशय सुंदर व सुबक पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या. या स्पर्धेसाठी शाळेचे ज्येष्ठ कला शिक्षक रवींद्र भोईटे , योगेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक प्रसाद जोशी, द्वितीय क्रमांक स्वप्निल नेवे, तृतीय क्रमांक विलास पालीवाल तसेच योगेश चौधरी, दीप्ती साळी, शुभांगी येवले,…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी हौसिंग सोसायटीची स्थापना जळगावमध्ये दि. ०९/०९/१९४८ ला झाली होती. तत्कालिन सहकारातील प्रस्थ कै. आप्पासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांनी काही सहकार्यांच्या माध्यमातून सहकारी हौसिंग सोसायटीची कल्पना प्रत्यक्षात आणली. अशा या दि जळगाव को-ऑप. हौसिंग सोसायटीचा नुकताच अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळा वृक्षारोपण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते व सर्व सभासदांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता धर्मदाय उपायुक्त एम. डी. गाडे , सहा. धर्मदाय आयुक्त स्मिता धारगे , सहा. धर्मदाय आयुक्त रंजना ठवरे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून अमृत महोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गोदावरी हॉस्पिटल व नेत्रज्योती…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील ३१ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या अनुशंघाने यावर्षी बँकेच्या वतीने श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये स्थापित केलेल्या ११ मारूतींच्या देखाव्याचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान,जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निलम जोशी तर उपाध्यक्षपदी मनीषा आवारे याची निवड करण्यात आली. जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या वर्षी सर्व महिला सदस्यांची कार्यकारणी…