Author: Saimat

साईमत : जळगाव : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाने अंतिम सामन्यात अनुभूती शाळेचा 3-0 असा पराभव करत विजय मिळवत पुढे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 14 ते 19 वर्षातील तालुकास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 या सोमवार, दि.११ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या संघातील खेळाडू चि.देवेश चौधरी, चि.संकेत पाटील आणि चि.रुद्र पाटील यांनी अष्टपैलू खेळ करीत संघास विजय मिळवून दिला. विजेत्या संघाचे आणि…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्यासाठी कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विभागातंर्गत एआरटी केंद्र येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश एस. पी. सय्यद, समाज सेविका समांतर विधी सेवा सहा. भारती कुमावत, दिपशिखा साखला, माधुरी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी-संजय पहूरकर, ART वैद्यकीय अधिकारी अनुपमा जावळे आदी उपस्थित होते. न्यायाधिश एस. पी. सय्यद यांनी एचआयव्ही सह जीवन जगणा-या लोकांना त्याना काही कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागाकडे अर्ज करण्याबाबत आवाहन केले. जिल्हा विधी…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने जळगाव शहरातील चार महनीय व्यक्तिमत्त्वाला जळगाव रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यात मुस्लिम समाजाचे डॉ. अब्दुल गफार मलिक यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन महापौर जयश्री महाजन यांना लेखी पत्र देऊन त्यांचे आभार मानले. जळगाव शहरात मुस्लिम समाजाचे अनेक व्यक्तिमत्व असताना सुद्धा महानगरपालिकेने मुस्लिम समाजातील खरा व प्रामाणिक तसेच ज्याची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्याच्या जवळ असलेली नीतिमत्ता, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, गरिबी जाणणारा, समाजकार्यात आल्यावर आपले इतर उद्योगधंदे बंद करून प्रामाणिक कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात स्वकष्टाने कार्यरत असणारे…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथिल गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची कामना करत दिनांक ११ ते १३ संप्टे पर्यंत इंडक्शन प्रोग्राम आयोजीत करण्यात आला असून थाटात उदघाटन करण्यात आले. प्रथम दिवशी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग पाटील मुख्य अतिथी, तर गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्राध्यापक दीपक झांबरे, अभियांत्रिकी, अधिष्ठाता प्राध्यापक हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्राध्यापक अतुल बर्‍हाटे सह सर्व विभाग प्रमुख उपस्थीतीत गणेश वंदना व सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रथम सत्रात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ.पराग पाटील यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.…

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध शृंगार साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव, दुसऱ्या सोमवारी दिव्यांचा महादेव, तिसऱ्या सोमवारी रांगोळी पासून शिवलिंग थ्रीडी बनविण्यात आले आणि चौथ्या सोमवारी सप्त धान्य पासून महाकलेश्वर चे शिवलिंग बनविले आहे. त्यात धान्याची सामग्री अशी, 51 किलो गहू, तांदूळ, हरिवे मूग, उडीद, चणा डाळ, ज्वारी, मसूर डाळ या धान्यापासून शिवलिंगाची आरास साकारण्यास 2 तासाचा अवधी लागला. ही शिवलिंगाची आरास मानव सेवा शाळेतील कला शिक्षक सुनील दाभाडे सर यांनी आपली कला साकारली आणि सर्व शिवभक्त यांनी मदत दिली.सुनिल दाभाडे यांचे अभिनंदन केले.

Read More

साईमत : जळगाव : प्रतिनिधी मू. जे. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त जनजागृती पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. रागिब अहमद यांनी व्याख्यानात आत्महत्यांचे कारणे मीमांसा विषद केली. 2018 ते 2022 वर्षात जळगाव जिल्ह्यात 2975 इतक्या आत्महत्या झाल्या ही खूप गांभीर्याची बाब असून त्यांवर उपाययोजना उभी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रागिब अहमद यांनी सांगितले की, आज आपण सामाजिक बांधिलकी पासून दूर गेलो, कौटुंबिक संस्था उध्वस्त होत गेल्या, मित्रा पासून दूर जात आहे, व्यक्ती विभक्त कुटुंब पद्धतीत वावरत आहेत व स्वतः कुटुंबापासून सुद्धा दूर जात आहे, त्यामुळे त्याच्या भावनां व्यक्त होत नाही किंवा भावना व्यक्त करण्यासाठी…

Read More

साईमत, साक्री : प्रतिनिधी जेष्ठ विधिज्ञ ॲड.उत्तमराव मराठे यांचा नातू आणि ब्रिगेडियर हितेंद्र मराठे SM *(सेना मेडल,बार टू) यांचा मुलगा लेफ्टनंट सौरभ हितेंद्र मराठे यांस चेन्नई येथील OTA (ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) येथे अतिशय खडतर पद्धतीचे प्रशिक्षण पूर्ण करून काल दि.९ सप्टेंबर २०२३ रोजी सैन्यदलातील शानदार अश्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपती कमिशन प्राप्त झाले. लेफ्टनंट सौरभ यांनी सुरूवातीला औरंगाबाद येथील SPI सर्व्हिसेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून सेनादलातील अधिकारी पदाचे प्राथमिक शिक्षण घेतले त्यानंतर इंजीनियरिंग बरोबरच सेनादलासाठी अधिकारी पदाच्या परीक्षा देखील देत होता,मागील वर्षी सौरभला SSB उत्तीर्ण करण्यात यश आले. आक्टो. २०२२ चेन्नई येथील OTA (ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. हा दिक्षांत…

Read More

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी येथील एम एच एस एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. राजपूत हे माळीवाडयातील संत सावता व्यायाम शाळेत मल्लखांब शिकवणार आहेत. संत सावता गणेश मंडळ आणि व्यायाम शाळा युवा गणेश मंडळ यांच्या तर्फे मल्लखांबाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन आणि आखाडा पुजन राज्यस्तरीय मल्लखांब चॅम्पियन गोकुळसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक आर. डी. राजपूत, एम जे राऊळ, माजी उपनगराध्यक्ष भिला माळी, प्रविण माळी, राजेंद्र माळी, दिपक देशमुख, गजेंद्र भामरे, एन. एस. माळी यांच्यासह व्यायाम शाळेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मनोगतात राजपूत यांनी दररोज संध्याकाळी दोन तास मुले आणि मल्ल यांना…

Read More

साईमत, साक्री : प्रतिनिधी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी व जीके नांद्रे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी येथील बाल आनंद नगरी येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे पुतणे शिल्पकार रवी सुतार हे प्रमुख मार्गदर्शक होते त्यांनी स्वतः शाडू माती पासून गणपती मूर्ती कशी तयार करावी याचे प्रशिक्षण सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना केले प्रशिक्षणार्थींमध्ये विविध वयोगटातील कलावंतांचा समावेश होता कार्यक्रमाचे उद्घाटन साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त उज्वलाताई बेडसे प्राचार्य एस बी पाटील सर शिल्पकार रवी सुतार सौरिताताई मोरे मनीषाताई सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सौ उज्वलाताई बेडसे व प्राचार्य पाटील…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी बंद घराचा फायदा घेत चोरट्याने घरातील किमती सामान लांबविल्याची घटना पारोळा रोडवरील मनमाडजीन भागात रविवारी उघडकीस आली. यात चोरट्याने ५० हजारांचे विविध घरगुती साहित्य लांबविले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चहाविक्रेता स्वप्निल सुनील गवळी (वय २८, रा. गल्ली नंबर ७, सोनदेव वाडा चौक, मनमाड जीन, धुळे) या तरुणाने आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गवळी परिवार कुठे बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद होते. चोरट्याने ही संधी साधून घराला लावलेले कुलूप तोडले. घरात प्रवेश करत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरात शोधाशोध केली. लोखंडाचे कपाट शोधून काढून ते फोडण्यात आले. त्यात ठेवलेली रोख रक्कम,…

Read More