शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शानभाग विद्यालयाचा संघ विजयी

0
1

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाने अंतिम सामन्यात अनुभूती शाळेचा 3-0 असा पराभव करत विजय मिळवत पुढे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 14 ते 19 वर्षातील तालुकास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 या सोमवार, दि.११ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या संघातील खेळाडू चि.देवेश चौधरी, चि.संकेत पाटील आणि चि.रुद्र पाटील यांनी अष्टपैलू खेळ करीत संघास विजय मिळवून दिला.

विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी , क्रीडा समन्वयक सुर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील, क्रीडा शिक्षक संजय यादव, फुटबॉल संघाचे कोच उदय फलक, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे , ललित लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here