साईमत, धुळे : प्रतिनिधी धुळे ते दादर एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवसांऐवजी रोज धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून लवकरच परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. यासह धुळे ते चाळीसगाव या पॅसेंजरच्या चार फेऱ्या दररोज होत असून रात्रीची एक फेरी वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दसरा मैदानजवळील रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना खा. डॉ. भामरे यांनी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने आपण पाळणार असल्याची ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली. गाडी क्रमांक ०१०६५ डाऊन दादर-धुळे एक्स्प्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ४:१५ वाजता सुटते. धुळे स्थानकावर…
Author: Saimat
साईमत, साक्री : प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल जवळ बाळगणार्य़ा तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निजामपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी सापळा लावून पकडले. त्याच्याकडून ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले. निजामपूर बसस्थानकाच्या परिसरात करण जगन शिंदे (२६) हा तरुण संशयितरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी नवापूर शहरातील मिरवणूक डीजे व डाँल्बीमुक्त करण्याच्या नवापूरचा गणेश मंडळांनी निर्धार केला आहे. गणेश मंडळांनी पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवून नवापूर शहराची आदर्श मिरवणूक परंपरा कायम ठेवा असे आव्हान नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केले. नवापूर पोलीस ठाणे येथे आयोजित मंडळाचा पदाधिकारीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक-पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात बैठक संपन्न झाली. डॉल्बी व डीजे च्या आवाजाने मानवी शरीरात होणाऱ्या विपरीत परिणाम यावेळी स्पष्ट करण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केलेल्या आव्हानाला सर्व मंडळांनी एका सुराने प्रतिसाद देत गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व डॉल्फीमुक्त करण्याच्या गणेश मंडळांनी निर्धार केला.…
साईमत : शिंदखेडा : प्रतिनिधी शिंदखेडा बस आगारातर्फे भाविकांना सोयीचे व सवलतीत देवदर्शनाला जाता यावे म्हणून ४४ प्रवासी जमल्यास महाराष्ट्रात कोठेही बस देवदर्शनाला निघेल अशी माहिती आगार व्यवसथापाक प्रमोद चौधरी व वाहतूक निरीक्षक प्रीती पाटील यांनी दिली शिंदखेडा आगराची बस ४४ प्रवासी जमल्यास देवदर्शनाला निघणार असून यात शिंदखेडा-तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर-जेजुरी-शिर्डी येथे फूल तिकीट १९०५/- हाफ तिकीट ९५५/- महिला व जेष्ठ नागरिक सवलत असणार आहे. शिंदखेडा-तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर-जेजुरी-शिर्डी-रांजणगाव- देहू- आळंदी- भीमाशंकर- मोरगाव- शिंदखेडा ४ दिवस व ३ मुक्काम साठी फुल तिकीट- २९७५ /-हाफ तिकीट १४९० /- असणार आहे. तसेच अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ,एक दिवशी यात्रा, सप्तशृंगी गड, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग, किंवा इतरत्र कुठेही,…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या फिजीओथेरपी अंतिम वर्षाच्या परिक्षांचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहिर करण्यात आला. यात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा निकालाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ यामध्ये फिजीओथेरपीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली असून नुकताच निकाल जाहिर झाला. यात डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील साक्षी सुनिल पाटील हिने ७०.५ टक्के गुण संपादन करुन प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय समिक्षा मोहन भोंगाळे हिला ६८.८८ टक्के आणि तृतीय मुस्कान जयप्रकाश गुमनानी ६८.२५ टक्के गुण प्राप्त केले. याशिवाय अन्य प्रविष्ठ विद्यार्थ्यांनीही चांगले गुण प्राप्त करुन यशाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी युजीसी च्या नियमानुसार उच्च शिक्षणात संशोधन कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीएच.डी. प्रवेश परीक्षा’ हा पहिला महत्वपूर्ण टप्पा असून तो पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. परंतु आजवर पेपर क्र. १ मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन कार्यशाळांची नितांत गरज आहे. ज्याद्वारे उच्च शिक्षणातील संशोधक विद्यार्थ्यांचे प्रमाण आपल्याला वाढवता येऊ शकते. असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. एस. टी. इंगळे यांनी केले. विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेतील शिक्षणशास्त्र विभागाद्वारे आयोजित एक दिवसीय ‘पीएच.डी. प्रवेश परीक्षा’ पेपर १ या मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन प्रसंगी…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा एकविध क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून भौतिक सुविधा, आर्थिक अनुदान व विविध समस्येबाबत वाद उद्भवला असून त्याबाबत क्रीडा संघटना या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार व तोंडी स्वरूपात चर्चा करीत असल्याचे वृत्त जिल्हाधिकारी यांनी वर्तमानपत्रा द्वारे वाचून त्वरित क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी एक वाजता त्यांच्या दालनात बोलवली होती. क्रीडा संघटना तर्फे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, सचिव डॉ. प्रदीप तलवलकर, उपाध्यक्ष श्याम कोकटा, सहसचिव फारूक शेख व राजेश जाधव, संचालक नितीन बरडे, दिलीप गवळी, प्रवीण ठाकरे व रवींद्र धर्माधिकारी, निवासी उप जिल्हधिकारी सोपान कासार…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे मान्यतेने एकलव्य क्रीडा संकुल आयोजित दुसरी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेस एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण साठी प्रमुख पाहुणे डॉ.निलेश चौधरी, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील , कलादर्षचे संचालक सचिन चौघुले, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय चे क्रीडा शिक्षक रणजित पाटील, बाहेती कॉलेज चे क्रीडा शिक्षक हरीश शेळके, एन.आय.एस टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, जळगाव मेडिकल चे संचालक स्वानंद साने, शैलेश जाधव उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विक्रम केसकर यांनी केले. कार्यक्रमास एकलव्य टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, अॅड.…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी शासन परिपत्रकानुसार 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा या मागणीचे निवेदन माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना देण्यात आले आहे, तसेच जळगाव महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेलने पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की , ” माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी यासाठी शासकीय आस्थापना म्हणून…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी महावितरणतर्फे ‘एक खिडकी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तात्पुरती जोडणी पासून विजेसंबंधीच्या सर्व सोयी-सुविधांच्या पुर्ततेसाठी या ‘एक खिडकी’ उपक्रमाचा फ़ायदा गणेश मंडळांना होणार आहे. उपविभागीय कार्यालयात ही एक खिडकीची सोय उपलब्ध असणार असून याचा गणेश मंडळांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. प्रत्येक उपविभागीय स्तरावर एक खिडकीचा उपक्रम दि.११ सप्टेंबर पासून सुरु करुन सर्व गणेश मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी सहकार्य करण्याच्या सुचना मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी महावितरण यंत्रणेस दिलेल्या आहेत. गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या जोडण्या…