साईमत जळगाव प्रतिनिधी गुण असले तर सुंदरता कमी असते आणि सुंदरता असली तर गुण कमी असतात. त्यामुळे लग्नासाठी आपला जोडीदार शोधत असताना गुण आणि सुंदरता यामध्ये तोडजोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. ते नागवेल प्रतिष्ठान आयोजित बारी समाजाच्या वधु वर परिचय मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. नागवेल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षाप्रमाणे बारी समाज बांधवांच्यावतीने वधुवर परिचय मिळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात एकुण १२५ उपवधू तर ११८ उपवर यांनी आपला परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नागवेल वधु वर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) माजी महापौर विष्णू भंगाळे , शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर लगत असलेल्या बांभोरी पुलाचे समांतर रस्ते सह बंधारा बांधण्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त पुलाचे बांधकामाचे टेंडर निघाल्याने त्यावर आवश्यक तो निधी वाढवून पूलासह बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली. शासकीय विश्रागृह येथे रविवारी झालेल्या बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात आली. हि कृती समिती पूलासह बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणार आहे. पूर्वीची समांतर रस्ते कृती समिती हीच बांभोरी पुल – बंधारा कृती समिती म्हणून कार्यरत आहे. बैठकीला माजी महापौर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मनपा माजी विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, मनसे जिल्हा प्रमुख जमील देशपांडे, भाजपचे डॉ. राधेश्याम…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील सालार नगर परिसरात बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नवीन मतदार नोंदणी करणे तसेच मतदान कार्डे दुरुस्ती करणे अश्या आशयाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन बागबान विकास फाउंडेशन चे अध्यक्ष तथा वाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिराला सालार नगर परीसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले. नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी करणे, स्मार्ट कार्ड, पत्ता बदल, फोटो बदल, नावात बदल, या संदर्भात आपले फॉर्म भरून दिले. या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात घेतला. या शिबिरात इंजिनीयर सईद खाटीक, मोहसीन खान, एजाज शाह खान यांचे सहकार्य…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधीमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड निमंत्रणावरून महाराष्ट्रातील 12 आमदारांचे शिष्टमंडळ सोमवारी, 20 ते शनिवारी, 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. त्यात चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांची निवड झाली आहे. ते रविवारी, 19 रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडनला रवाना झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाल्याने आ. मंगेश चव्हाण यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.अभ्यास दौऱ्याच्या निमित्त वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि…
साईमत पाळधी, ता.धरणगाव वार्ताहर येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा लाख रुपये पेव्हर ब्लॉकसाठी मंजूर केले आहे. त्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक देविदास पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी जि. प.सदस्य प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी नवीन निवडून आलेले ग्रा.पं.सदस्य चंदू इंगळे, राहुल धनगर, उमेश पाटील, निसार देशमुख, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झवर, उदय झवर, कैलास इंगळे, कृष्णा चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी ‘चाळीसगाव पोलिसात केस करतो का’, अशी विचारणा करत दोघांनी मोटारसायकल अडवून शाबीर जाबीर शाह उर्फ सोनू शाह यांच्यावर चॉपरने हल्ला केला. तसेच बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी तिरंगा पुलावर घडली होती. याप्रकरणी हुडको कॉलनी परिसरात गुन्हा दाखल केला आहे. शाबीर शाह हे दुचाकीने जात असताना हुडको कॉलनीतील अहमद इस्माईल पठाण आणि त्याचा भाऊ फिरोज इस्माईल पठाण याने तिरंगा पुलावर त्यांना अडविले. शाह हे हिरापूर रोडकडे जात होते. अहमद पठाण याने चॉपरने शाह यांच्या डाव्या बाजूच्या पंजावर आणि पायाच्या पंजावर मारहाण केली. ‘तू आमच्याविरुद्ध केस करतो का’, असे म्हणून शिवीगाळ केली. ‘तुला…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्था यांच्या संयुक्त विदमानाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. शहरातील गेंदलाल मिल परिसर, स्टेशन परिसर व महामार्ग वरील सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना या ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रकाश जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष रवी पांडे, सुशील पंडित, विजय जोशी, लोचन पाटील, चेतन पाटील, जितेंद्र रडे ,कृष्णा तिवारी आदी उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी टीआर -१ , टीआर – ४ (फ्युसारियम विल्ट) हा एक विषाणूजन्य रोग असल्याने एकदा संसर्ग झाल्यानंतर किमान ३० वर्षे मातीत अस्तित्व राखणारा हा विषाणू त्या परिसरातून केळी नष्ट करून टाकतो. तसेच तो मातीतून मुळांमध्ये प्रवेश करतो व खोडातील पाणी तसेच पोषक तत्वांवर मारा करुन केळी पूर्ण नष्ट करतो. जगभरात अत्यंत घातक विषाणू अशी त्याची ओळख आहे. जगभरातील केळी उत्पादनासाठी हा रोग सर्वात मोठा धोका आहे. ज्या-ज्या राज्यांत या विषाणूचा शिरकाव झाला आहे तेथील केळी पूर्णपणे नष्ट झाली आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची…
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेत जळगाव शहराला मंजुरी मिळाली आहे. सदर योजनेसाठी बस डेपोसाठी मनपाने प्रभाग समिती तीन जवळील गट क्र ४१८/४१९ ही जागा निश्चित केली आहे. सदर जागेची पाहणी गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. दरम्यान, लवकरात लवकर सदर जागेसंदर्भात अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याचा सूचना केल्या त्यांनी यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी भरतदादा अमळकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, महावितरणचे अभियंता श्री चोपडे, मनपाचे विद्युत अभियंता एस. एस. पाटील, प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते. योजनेसाठी बस डेपोसाठी सर्व प्रक्रिया पुर्ण करून लवकरात…
साईमत जळगाव प्रतिनिधी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाऊंडेशन व दादा प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी ७, शिवाजी नगर, जळगाव येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाला रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराच्या फलकाचे अनावरण मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ पद्मश्री उज्वलजी निकम, रत्नभाभी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिनाक्षी जैन, राजेश जैन, शैलेश जैन, तृप्ती जैन, याचना जैन, ॲडव्होकेट अनिकेत निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, इंडियन रेड…