साईमत जळगाव प्रतिनिधी
गुण असले तर सुंदरता कमी असते आणि सुंदरता असली तर गुण कमी असतात. त्यामुळे लग्नासाठी आपला जोडीदार शोधत असताना गुण आणि सुंदरता यामध्ये तोडजोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. ते नागवेल प्रतिष्ठान आयोजित बारी समाजाच्या वधु वर परिचय मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
नागवेल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षाप्रमाणे बारी समाज बांधवांच्यावतीने वधुवर परिचय मिळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात एकुण १२५ उपवधू तर ११८ उपवर यांनी आपला परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नागवेल वधु वर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) माजी महापौर विष्णू भंगाळे , शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष विजया खलसे, नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण बारी, जामनेरचे डी डी आर, जगदीश बारी, शिरपूरचे प्राचार्य संजय बारी, प्रा आर एच बारी, नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा नितीन बारी, यशवंत बनसोडे, प्रा ईश्वर धामणे, विठ्ठल फासे , भाजपाचे अमृत खलसे , माजी नगरसेविका शोभा बारी, मंगला बारी, सुनील शिनकर, मुंबईचे संतोष अस्वार, राहुल अस्वार , वर्षा रोकडे , महानगरपालिका अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष विजय बारी आदी उपस्थित होते.
नागवेल प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे लग्न जुळण्यास मदत होते. यंदा १२५ उपवधू तर ११८ उपवर यांनी आपला परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नागवेल वधु वर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेश ,गुजरात व महाराष्ट्रातून बारी समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते विष्णू भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन पुणे येथील भरत बारी व टीव्ही अँकर दिशा भावे यांनी केले . तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण बारी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष भूषण बारी,उपाध्यक्ष विनोद लावणे,सचिव अतुल बारी, प्रकाश रोकडे,नितीन बारी,लतीश बारी,अरुण बारी,राहुल बारी,भरत बारी,योगेश बारी,सागर बारी आदींनी परिश्रम घेतले.