सालार नगर परिसरात नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती शिबिर

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील सालार नगर परिसरात बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने नवीन मतदार नोंदणी करणे तसेच मतदान कार्डे दुरुस्ती करणे अश्या आशयाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिराचे उद्घाटन बागबान विकास फाउंडेशन चे अध्यक्ष तथा वाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिराला सालार नगर परीसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले. नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी करणे, स्मार्ट कार्ड, पत्ता बदल, फोटो बदल, नावात बदल, या संदर्भात आपले फॉर्म भरून दिले. या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात घेतला. या शिबिरात इंजिनीयर सईद खाटीक, मोहसीन खान, एजाज शाह खान यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here