मुंबईः प्रतिनिधी आरे कारशेडविरोधात केलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून युवा सेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना याबाबत नोटीस पाठवली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आरेच्या जमिनीवरच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी पुन्हा एकदा आरे परिसरात आंदोलन सुरू केले. आदित्य ठाकरे यांनी रविवारी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी लहान मुलांचा वापर केल्याची तक्रार सह्याद्री राइट्स फोरमचे लिगल हेड दृष्टिमान जोशी…
Author: Saimat
यावल : साईमत प्रतिनिधी लाईव्ह दि.9रोजी यावल येथिल जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त यावल शहरात भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम, संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर,संत, मीराबाई अशा विविध संतांच्या वेशभुषा साकारण्यात आल्या होत्या.सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी पालखी काढण्यात आली होती. सर्व विद्यार्थी वारकरी वेशभुषेत आले होते.टाळमृदुंग व हरीनामाच्या गजरामध्ये जे.टी. महाजन शाळेपासून ते गावातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापर्यंत भव्य दिव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दिंडी सोहळ्यामध्ये यावल येथिल पीएसआय खांडबहाले यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडी सोहळा…
यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह रविवारी सुट्टी असल्याने सोमवार दि.11 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान करीत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली. शिक्षक शिक्षकेतेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित स्तुत्य उपक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांसह विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा धारण केली होती.विद्यार्थी बहुसंख्येने शाळेत उपस्थित होते.तसेच त्यांच्या या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला अलौकिक आणि लक्षवेधी स्वरूप प्राप्त झाले होते.काही विद्यार्थ्यांनी राम,लक्ष्मण व सिता तसेच…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथे काही दिवसापासून वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे.काही वेळा तर रात्र भर विजे अभावी रात्र अंधारात काढावी लागते. दिवसा देखील अनेकवेळा वीज गायब होत असल्यामुळे विजेवर अवलंबून असलेल्या छोटया मोठया व्यवसायावर याचा परिणाम होतो.पाऊसामुळे डास, मच्छर वाढले आहे त्यात लाईट नसल्याने त्याचा त्रास होतो. याविषयी आज नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊ शाखा अभियंता श्री गौर यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. लोकप्रतिनिधी व महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक बंटी काळे, अजित काळे, राजू दुतोंडे, पप्पू पठाडे, पूनम परदेशीं, सुधीर पठाडे,धीरज काळे,अतुल…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी आज शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री येथे खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत १४ खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. अशातच या बैठीकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच इतर खासदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. खासदारांच्या मागणीला राऊत यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत सर्व खासदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता मातोश्रीवरून रवाना झाले. राऊत अन्य खासदारांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.…
मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Sangram Singh) यांचा विवाह सोहळा ९ जुलै रोजी थाटात पार पडला. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. पायल आणि संग्राम यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. पायल आणि संग्राम हे दोघे जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट करत होते. आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने लग्नामध्ये लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. त्याचबरोबर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता. दोघांचाही लूक चाहत्यांना पसंतीस पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्नात पायलने कुठल्याही…
मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. विधिमंडळात आपणच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर त्याला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. आता शिंदे गट पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सावध पवित्रा घेतला आहे. शिंदे गट पोहचण्यापूर्वीच शिवसेनेने (Shivs) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. शिवसेनेत उभी फूट झाल्यानंतर दोन्ही बाजूने अधिकृत शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष दोन्ही बाजुला पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाणार? असा प्रश्न आता…
साईमत लाईव्ह जळगाव विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागातील कामे वाटपाच्या दहा टक्केवारीचा विषय यासह सुशिक्षित बेरोजगारांची कामे वाटपाच्या यादीतील घोळ व पाटील नामक कर्मचाऱ्यांची चक्क कागदपत्रे व फाईली घरी नेेऊन मनमानी केल्याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविला आहे.तरीसुद्धा कार्यकारी अभियंता श्री. ढिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी ‘तोंंडावर बोट हाताची घडी’ अशी भूमिका घेत कागदी घोडे नाचवित आम्ही कार्यवाही करीत आहोत असा कांगावा सुरु ठेवला आहे. याबाबत मात्र जि.प.चे सीईओ पंंकज आशिया यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. जि.प.च्या बांधकाम विभागातील लेख सहायक पी.एम पाटील यांनी सरकारी कागदपत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन आपल्या मनमानीप्रमाणे…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा उपसा जलसिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. संस्थेच्या पंप हाऊस मधील मोटार, पाईप अनेक साहित्य चोरीला गेले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्कालीन आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी आमोदा,भालोद, बामणोद या उपसा योजनांच्या पुनरुज्जीवन साठी लागणाऱ्या मान्यता व 80 कोटींचा निधी 2018 साली मंजूर करून आणला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव व कोविड-19 मध्ये कोरोनामुळे त्यांचे झालेले निधन यानंतर कुणीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाले नाही. आमोदा येथील उपसा सिंचन यंत्रणा अगदी जुनी झाल्याने व अनेक वस्तू…