मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Sangram Singh) यांचा विवाह सोहळा ९ जुलै रोजी थाटात पार पडला. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. पायल आणि संग्राम यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. पायल आणि संग्राम हे दोघे जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट करत होते. आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने लग्नामध्ये लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. त्याचबरोबर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता. दोघांचाही लूक चाहत्यांना पसंतीस पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्नात पायलने कुठल्याही…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे हत्यार उपसल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. विधिमंडळात आपणच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यानंतर त्याला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. आता शिंदे गट पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सावध पवित्रा घेतला आहे. शिंदे गट पोहचण्यापूर्वीच शिवसेनेने (Shivs) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. शिवसेनेत उभी फूट झाल्यानंतर दोन्ही बाजूने अधिकृत शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष दोन्ही बाजुला पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाणार? असा प्रश्न आता…
साईमत लाईव्ह जळगाव विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागातील कामे वाटपाच्या दहा टक्केवारीचा विषय यासह सुशिक्षित बेरोजगारांची कामे वाटपाच्या यादीतील घोळ व पाटील नामक कर्मचाऱ्यांची चक्क कागदपत्रे व फाईली घरी नेेऊन मनमानी केल्याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविला आहे.तरीसुद्धा कार्यकारी अभियंता श्री. ढिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी ‘तोंंडावर बोट हाताची घडी’ अशी भूमिका घेत कागदी घोडे नाचवित आम्ही कार्यवाही करीत आहोत असा कांगावा सुरु ठेवला आहे. याबाबत मात्र जि.प.चे सीईओ पंंकज आशिया यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. जि.प.च्या बांधकाम विभागातील लेख सहायक पी.एम पाटील यांनी सरकारी कागदपत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन आपल्या मनमानीप्रमाणे…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा उपसा जलसिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. संस्थेच्या पंप हाऊस मधील मोटार, पाईप अनेक साहित्य चोरीला गेले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्कालीन आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी आमोदा,भालोद, बामणोद या उपसा योजनांच्या पुनरुज्जीवन साठी लागणाऱ्या मान्यता व 80 कोटींचा निधी 2018 साली मंजूर करून आणला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव व कोविड-19 मध्ये कोरोनामुळे त्यांचे झालेले निधन यानंतर कुणीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाले नाही. आमोदा येथील उपसा सिंचन यंत्रणा अगदी जुनी झाल्याने व अनेक वस्तू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रिम कोर्टामध्ये आज झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेने व्हीप बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तसेच, तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची स्थिती जैसे थे राहणार आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं (Shivsena) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी विनंती…
मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असल्याने संख्याबळाअभावी शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलेले नाही. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समोर आल्याने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभापाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेला मिळण्याबाबत साशंकता आहे. अशातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार आहे. विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. यामध्ये आमच्याकडे विधान परिषदेत सर्वाधिक १३ सदस्य आहे. त्यामुळे…
शेंदुर्णी : प्रतिनिधी साईमत लाईव्ह खानदेश चे प्रति पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या व भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शेंदुर्णी एकादशीला लाखो भाविकांनी दोन वर्षानंतर भगवंताचे नयन मनोहर रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध संख्या, पतसंस्था ,नगरपंचायत,राष्ट्रीय, विद्यार्थी परिषद , सामाजिक राजकीय संस्था संघटना , नगरसेवक यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी फराळ चहा, दूध, केळी, वाटप करण्यात आले. सकाळी महापूजा व अभिषेक रात्री अकरा वाजता आमदार गिरीश महाजन, जामनेरच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, जिल्हा परिषदेच्या सदस्य सरोजिनीताई गरुड, पं दिनदयालाजी उपाध्यक्ष पत संस्थेचे चेअरमन अमृत खलसे, शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष…
यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह येथील तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तालुक्यातील सावखेडासिम येथील अजय आत्माराम पाटील यांची तर सचिवपदी अतुल निळकंठ यादव यांची येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. मुकेश येवले हे होते. येथील तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारणीची निवड यासह विविध विषयावर येथील तालुका खरेदी विक्री संघाची सभागृहात,गुरुवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली बैठकीत तालुकाध्यक्षपदी अजय पाटील तर सचिवपदी अतुल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मोहराळे येथील धनराज जिजाबराव पाटील,के. यु.पाटील,बी.डी.पाटील,यांची तर कार्याध्यक्षपदी डी.बी.पाटील, सहसचिवपदी उंटावद येथील महेश पाटील,कोषाध्यक्षपदी दहिगावचे संदीप बाळकृष्ण पाटील,यावल…
उमाळे : साईमत लाईव्ह प्रतिनिधी श्रद्धेला मानवी एकात्मतेची गुंफण देणारी, परस्परांमधील आत्मीयता , आदर आणि बंधुभाव टिकवून ठेवणारी वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतर सुरू राहावी , सर्वावरील कोरोनाचे सावट पूर्णपणे निघून जावे, ही मनोकामना ठेवत. आज आषाढी एकादशी निमित्ताने , माध्यमिक विद्यालय उमाळे ता.जि.जळगांव येथे , मुख्याध्यापक गणेश सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली , इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांस्कृतिक वेशभूषा परिधान करत लेझीम, पाऊली , विठ्ठलाच्या नामघोषासह दिंडी काढली, त्याप्रसंगी ग्रामपंचायत उमाळे येथील प्रथम नागरिक सौ. संगीता योगेश खडसे – सरपंच आणि श्री. योगेश खडसे यांच्या…