अभिनेत्री पायलचा विवाह झाला या कुस्तीपटू सोबत

0
3

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Sangram Singh) यांचा विवाह सोहळा ९ जुलै रोजी थाटात पार पडला. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. पायल आणि संग्राम यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

पायल आणि संग्राम हे दोघे जवळपास १२ वर्षे एकमेकांना डेट करत होते. आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने लग्नामध्ये लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. त्याचबरोबर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता. दोघांचाही लूक चाहत्यांना पसंतीस पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे लग्नात पायलने कुठल्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता. स्वतःच्याच लग्नात मेकअप का केला नाही? असा प्रश्न तिला चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. या लग्नसोहळ्यात दोन्ही कुटुंबांतील मंडळी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here