Author: Saimat

नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून पावसामुळे वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. नवापूर तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामध्ये नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. अशात पावसाचा जोर वाढल्यामुळे नेसू, सरपणी, नागण नद्यांना पूर आला आहे. यामुळे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. संबंधित वाहतूक अजून काही तास खोडांबळण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या मार्गावरून वाहतूक वळवली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात 2 आमदार आणि 3 खासदार लाभलेले आहेत. तरीपण तालुक्याच्या विकास हा कासावापेक्षा हळू होत आहे. रस्ते म्हटलं म्हणजे एखाद्याच ठिकाणी रस्ता सापडावा असा. नाहीतर सगळीकडे फक्त गाराच गारा आणि चिखलाचे साम्राज्य. नुकतेच विद्यमान आमदार श्री उदयसिंह राजपूत यांनी मंजूर केलेला 5 कोटी रुपयांचा रस्ता सुद्धा राहिला तो कागदावरच. नागरिक आता बोलतात की,काय तो रस्ता,काय तो सोयगाव तालुका आणि काय ते लोकप्रतिनिधी. सगळं एकदम ok मध्ये आहे. सरकारी दवाखाना बघितला तर तिचं परिस्तिथी,पशुवैद्यकीय दवाखाना तर विचारूच नका. तिथे पत्ते खेळणाऱ्या गडींचाच डाव. आणि इतर सर्व सुविधा फक्त कागदोपत्री. लोकप्रतिनधींनी थोडंसं तर गावाच्या विकासावर भर…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सोयगाव पोलीसांचा औरंगाबाद दंगा काबू पथकाद्वारे सोयगाव शहरांमध्ये पोलीसांचे पथसंंचालन करण्यात आले.यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दि.९ शनिवार रोजी जुना बाजार चौक,वाल्मीपुरा,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पथसंंचलन करण्यात आले. हे पथसंंचालनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित, ज्ञानेश्वर सरताळे,गणेश रोकडे, रवींद्र तायडे ,राजू बर्डे,सादिक तडवी, अजय कोळी, महिला पोलीस कर्मचारी कविता कांदे, पो.कॉ.म्हस्के, श्रीकांत घागरे, यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथील कै. बाबुरावजी काळे स्कूल मध्ये “आषाढी एकादशी” निमित्त बालवारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी वारकऱ्यांच्या वेशात पोषाख परिधान करून आले होते त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी हा संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत आला असुन विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या चालीवर ठेका धरला व मुला – मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला दिंडी ही शाळेच्या आवारातुन छ.शिवाजी महाराज चौक ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजी नगर येथे दिंडीची सांगता झाली.त्यातच विद्यार्थ्यांना फराळ पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती.या दिंडीत शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस, एकनाथ कोलते, प्रणव कुलकर्णी मनिषा पाटील, शितल पगार, आशा पंडित, नम्रता…

Read More

साईमत लाईव्ह उमाळा प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  संगीता खडसे यांची बिनविरोध  निवड झाली. यासाठी उपसरपंच  सुरेश कंखरे, माजी सरपंच राजू  पाटील, सदस्य योगेश सोनवणे,  संदीप बिर्‍हाडे, राजेंद्र पाटील यांचे  सहकार्य लाभले. संगीता खडसे या राष्ट्रवादी युवकचे योगेश खडसे यांच्या पत्नी आहेत.या  निवडीबद्दल  त्यांच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून शिवसेना व छावा संघटनेच्या वतीने शनी महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असल्याने आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळाचे म्हणून शनी महाराजांची महाआरती करून महाराजांना तेल अर्पण करून साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष लालसिंग पाटील रविंद्र पाटील राजेंद्र पाटील गौरव…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. आता पक्ष संघटना पुन्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह पक्षातील निष्ठावान नेते मैदानात उतरले आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना बळ देण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.शिवसैनिकांनी संबोधित करताना त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. धनुष्यबाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला दिला आहे. …

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल येथील तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तालुक्यातील सावखेडासिम येथील अजय आत्माराम पाटील यांची तर सचिवपदी अतुल निळकंठ यादव यांची येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. मुकेश येवले हे होते. येथील तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारणीची निवड यासह विविध विषयावर येथील तालुका खरेदी विक्री संघाची सभागृहात,गुरुवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली बैठकीत तालुकाध्यक्षपदी अजय पाटील तर सचिवपदी अतुल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मोहराळे येथील धनराज जिजाबराव पाटील,के. यु.पाटील,बी.डी.पाटील,यांची तर कार्याध्यक्षपदी डी.बी.पाटील, सहसचिवपदी उंटावद येथील महेश पाटील,कोषाध्यक्षपदी दहिगावचे संदीप बाळकृष्ण पाटील,यावल…

Read More

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी  स्थानिक लोकसेवा शिक्षण बहुद्देशीय मंडळाद्वारे संचालित पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये चढा ओढ निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. नुकतेच दहावी व बारावीच्या राज्य परिक्षा मंडळाचा निकाल जाहीर झाला.त्यामध्ये हे शिक्षण झाल्यावर निश्चितच नोकरी मिळत असते.त्यामुळे उत्साह दाखवीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.       नुकतेच यावर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये या महाविद्यालयाला एन.बी.ए.चे मानांकन मिळालेले आहे. सदर मानांकन हे ज्या संस्थांना प्राप्त होते.त्यांचे शिक्षण हे आंतर राष्ट्रीय व्यावसायिक कंपन्यांसाठी निगडीत असलेल्या कायद्यांना अनुसरून जे कॉलेज पात्र असेल त्यांना च दिले जात असते. ते या कॉलेजला मिळाले…

Read More