यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह
रविवारी सुट्टी असल्याने सोमवार दि.11 रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान करीत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली. शिक्षक शिक्षकेतेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित स्तुत्य उपक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांसह विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा धारण केली होती.विद्यार्थी बहुसंख्येने शाळेत उपस्थित होते.तसेच त्यांच्या या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला अलौकिक आणि लक्षवेधी स्वरूप प्राप्त झाले होते.काही विद्यार्थ्यांनी राम,लक्ष्मण व सिता तसेच विठ्ठल व रुक्मिणी यांच्या भूमिका साकार केल्या होत्या.सर्व विद्यार्थी अत्यंत उत्साही व आनंदित होते व अत्यंत जल्लोषात त्यांनी संगीताच्या तालावर नृत्य सादर केले.टाळ तसेच झांज या वाद्यांसह शाळेत जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा एकच जयघोष दुम दुमला होता.सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या लेझीम खेळली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम, दिपक महाजन सर व प्रशांत फेगडे सर, वर्षा भुते, सविता बारी, मनीषा बडगुजर, सोनाली वाणी,टिना निंबाळे, वैशाली बडगुजर,सुवर्णा पाटील, कामिनी बोंडे, तेजस्विनी वाणी, गुणवंती फेगडे, तृप्ती पवार, धनश्री महाजन,कुंदा नारखेडे, योगिता सावळे,अर्चना चौधरी, अमृता कुलकर्णी ,झीनत शेख, प्रवीणा पाचपांडे,श्रद्धा साळुंखे, तसेच मीनाक्षी वारके,कुसुम फालक,तुषार माळी या सर्वांनी अत्यंत परिश्रम घेतले व सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करीत सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पड़ला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बारी मॅडम यांनी केले.तसेच दिपक महाजन सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना Save Soil चा संदेश दिला.संपूर्ण यावल शहराचे प्रमुख आकर्षण ठरलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला .