यावल : साईमत प्रतिनिधी लाईव्ह
दि.9रोजी यावल येथिल जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त यावल शहरात भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला.
दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम, संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर,संत, मीराबाई अशा विविध संतांच्या वेशभुषा साकारण्यात आल्या होत्या.सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी पालखी काढण्यात आली होती. सर्व विद्यार्थी वारकरी वेशभुषेत आले होते.टाळमृदुंग व हरीनामाच्या गजरामध्ये जे.टी. महाजन शाळेपासून ते गावातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापर्यंत भव्य दिव्य दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.
दिंडी सोहळ्यामध्ये यावल येथिल पीएसआय खांडबहाले यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिंडी सोहळा यशस्वी होण्याकरीता परिश्रम घेतले.दिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषात संपन्न झाला.