Author: Saimat

मुक्ताईनगर :प्रतिनिधी  तरुणीच्या आक्षेपार्ह पोष्ट व महीलांद्वारा मारहाण प्रकरणी या घटनेला काही समाज कंटकांनी धार्मिक रंग दिल्याने १५० ते २०० जमावाचे माथी भडकावून  त्यांच्या व्दारे त्या घटनेशी शिवराय नगर प्रभाग क्र १२ मधील कोणत्याही व्यक्तीचा काडीचाही संबंध नसताना या हिंदू वस्तीत १५० ते २०० च्या संख्येतील बेकायदेशीर जमावाने तलवारी, लाठ्या काठ्या , सळई, रॉड, ज्वलनशील साहित्य हातात घेवून काही घरांची नासधूस, दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड , घरांवर दगड फेक करित एका महिलेच्या मानेवर तलवार रोखून मारहाण केली.तसेच एका रहिवाशी मजुराच्या पायावर काहीतरी मारून त्याचा पाय मोडला असा नंगानाच करीत असताना धार्मिक नारेबाजी , आरड  ओरड, महिलांना अश्लील शिवीगाळ करून…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव केंद्रा अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर, केंद्रीय शाळा सोयगांव, प्राथमिक शाळा आमखेडा या शाळांची निसर्गसहल व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोयगांव केंद्रांचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसवाडी डोंगरावर आयोजन करण्यात आले.यावेळी तीघं शाळेतील जवळपास 500 विद्यार्थी या निसर्ग सहलीत व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.शुध्दतेची हमी,प्रदूषण कमी,लावा एक कलम,महनतीने करा संगोपन,सफल झालयं वृक्षारोपण या युक्ति प्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक,केंद्र प्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य नगरसेवक यांनी सोनसवाडी डोंगरावर नगरपंचायत सोयगांव यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून रोपण केलेल्या रोपांचे संगोपन करून वाढी लावण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.याचबरोबर सोनसवाडी डोंगरावर रामजीनगर येथिल विद्यार्थ्यांनी जमविलेल्या जवळपास दोन हजार…

Read More

साईमत लाईव्ह विजय चौधरी सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यातील गोद्री – पळासखेडा शिवारातील वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभाग जळगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे मोजमाप करून 5 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी सीमांकाम करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार ( दि.18 ) रोजी वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभागाने अंतिम परवानगी दिल्याने तातडीने रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सदरील रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने याठिकाणी रस्ता करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. गतिमान पध्दतीने हा रस्ता करण्यात यावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे.…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी शहरातील काही पंपावरील कर्मचारी ग्राहकांना पेट्रोल डिझेल डिलिव्हरी देतांना मशीन वरील सूचना “कृपया डिलिव्हरी लेने से पहिले शुन्य तरफ ख्याल दे ” ग्राहकांना वाचण्याची संधी न देता वाहने पुढे घेत व ग्राहकांना बोलण्यात व्यस्त ठेवतात व वाहनांमध्ये पेट्रोल दोन लिटर ऐवजी एकच लिटर वाहनांच्या टाकी मध्ये जाते अशी होते लूट ( पेट्रोल पंपावर आपण ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेलो तर आपल्या आधी गेलेल्या ग्राहकांनी अर्धा लिटर पेट्रोल भरले असेल आणि त्यवाहणाच्या मागे आपला नंबर आला आणि आपण दोन लिटर पेट्रोल टाकले असता आपल्या वाहनात दिड लिटर पेट्रोल टाकीत जाईल कारण आधीच्या वाहनात अर्धा लिटर पेट्रोल…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी शुक्रवारी पहिली बैठक घेतली. त्या बैठकीला अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेते मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. तुमाने यांच्या बैठकीला दोनशेच्यावर शिवसैनिक उपस्थित असल्याने शिवसैनिकांममध्ये अस्वस्थता वाढली आहे. तुमाने यांच्या बैठकीला आम्ही मोजकेच आलो. अनेकांना मुद्दामच निरोप दिले नव्हते. जेवढे बैठकीला आले त्यापेक्षा जास्त बाहेर आहेत, असा दावा समर्थकांनी केला. शिवसेनेत झालेल्या दोन गटामुळे भविष्यात शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष होणार असल्याचे दिसून येते. दिल्लीहून नागपूरला आल्यानंतर विमानतळावर शिवसैनिकांनी कृपाल तुमाने यांचे स्वागत केले. सोमलवाडा येथे तुमाने यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, रविभवन…

Read More

शिवसेना कुणाची याचे पुरावे काय मागता? हजारो शिवसैनिकांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी बलिदान दिलेले आहे, यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवा, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विनायक राऊतांनी तीन वेळा पत्र दिलं, त्याला उत्तर दिलं नाही राऊत म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावा काय मागता? पुरावा काय पाहिजे, सीमाप्रश्नासाठी शहीद झालेले आमचे शिवसैनिक हा पुरावा आहे. या मराठी माणसाच्या मनामनात, कणाकणात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. 10-20 आमदार फोडले हा काही पुरावा होऊ शकत नाही. शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते विनायक राऊत यांनी तीन वेळा पत्र देऊनही लोकसभा…

Read More

यावल : प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तसेच तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्तीच्या भंग करीत असल्याने तसेच यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह पुरवठा निरीक्षक हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने यावल तालुका भीम आर्मी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी प्रवीण डांबरे सांगितले. यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना शासनातर्फे धान्य पुरवठा मिळाल्यानंतर काही स्वस्त धान्य दुकानदार आपल्या दुकानात निश्चित अशा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक रेशन कार्ड धारकास किती धान्य मिळणार? दुकानात उपलब्ध धान्य साठा किती?धान्य वाटपचे प्रमाण…

Read More

यावल  : प्रतिनिधी  केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना राबविताना आरबीआयच्या सर्व अटी,शर्ती,नियम खड्ड्यात घालून यावल येथील यावल भुसावल रोडवरील एस बँकेकडून बँक खातेदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता बँकेच्या खात्यावरून पैसे वर्ग करून घेत असल्याची तक्रार बँकेत केली असता बँक मॅनेजरकडून अरेरावीची भाषा वापरुन उद्धट वागणूक दिली जात असल्याचे बँक खातेदारांमध्ये बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेचा बँक खातेदारांना लाभ मिळावा म्हणून यावल येथील एस बँक मॅनेजरने आपल्या शाखेतील बँक खातेदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता खातेदारांच्या खात्यावरून अटल पेन्शन योजने करिता काही रक्कम परस्पर वर्ग करून घेतल्याने संबंधित…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे 1 कोटी 21लाख 28 हजार रुपयांचे निकृष्ट बांधकाम राजकीय प्रभावाखाली असलेला ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांनी दुसऱ्याच गट क्र.असलेल्या जागेवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम आपल्या सोयीनुसार बेकायदा आणि मंजूर प्लॅन,इस्टिमेट प्रमाणे न करता तसेच मुदत संपल्यावर सुद्धा काम सुरू असल्याने या कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी म्हैसवाडी येथील एकूण 267 पुरुष महिला कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार म्हैसवाडी ग्रामपंचायत सह संपूर्ण अधिकाऱ्यांकडे केली असली तरी ग्रामस्थांची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी कचरा कुंडीत टाकल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात राजकारणात, बांधकाम क्षेत्रात बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हैसवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत म्हैसवाडी…

Read More