Author: Saimat

शिवसेना कुणाची याचे पुरावे काय मागता? हजारो शिवसैनिकांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी बलिदान दिलेले आहे, यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवा, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विनायक राऊतांनी तीन वेळा पत्र दिलं, त्याला उत्तर दिलं नाही राऊत म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावा काय मागता? पुरावा काय पाहिजे, सीमाप्रश्नासाठी शहीद झालेले आमचे शिवसैनिक हा पुरावा आहे. या मराठी माणसाच्या मनामनात, कणाकणात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. 10-20 आमदार फोडले हा काही पुरावा होऊ शकत नाही. शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते विनायक राऊत यांनी तीन वेळा पत्र देऊनही लोकसभा…

Read More

यावल : प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तसेच तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्तीच्या भंग करीत असल्याने तसेच यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह पुरवठा निरीक्षक हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने यावल तालुका भीम आर्मी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी प्रवीण डांबरे सांगितले. यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना शासनातर्फे धान्य पुरवठा मिळाल्यानंतर काही स्वस्त धान्य दुकानदार आपल्या दुकानात निश्चित अशा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक रेशन कार्ड धारकास किती धान्य मिळणार? दुकानात उपलब्ध धान्य साठा किती?धान्य वाटपचे प्रमाण…

Read More

यावल  : प्रतिनिधी  केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना राबविताना आरबीआयच्या सर्व अटी,शर्ती,नियम खड्ड्यात घालून यावल येथील यावल भुसावल रोडवरील एस बँकेकडून बँक खातेदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता बँकेच्या खात्यावरून पैसे वर्ग करून घेत असल्याची तक्रार बँकेत केली असता बँक मॅनेजरकडून अरेरावीची भाषा वापरुन उद्धट वागणूक दिली जात असल्याचे बँक खातेदारांमध्ये बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेचा बँक खातेदारांना लाभ मिळावा म्हणून यावल येथील एस बँक मॅनेजरने आपल्या शाखेतील बँक खातेदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता खातेदारांच्या खात्यावरून अटल पेन्शन योजने करिता काही रक्कम परस्पर वर्ग करून घेतल्याने संबंधित…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे 1 कोटी 21लाख 28 हजार रुपयांचे निकृष्ट बांधकाम राजकीय प्रभावाखाली असलेला ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांनी दुसऱ्याच गट क्र.असलेल्या जागेवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम आपल्या सोयीनुसार बेकायदा आणि मंजूर प्लॅन,इस्टिमेट प्रमाणे न करता तसेच मुदत संपल्यावर सुद्धा काम सुरू असल्याने या कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी म्हैसवाडी येथील एकूण 267 पुरुष महिला कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार म्हैसवाडी ग्रामपंचायत सह संपूर्ण अधिकाऱ्यांकडे केली असली तरी ग्रामस्थांची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी कचरा कुंडीत टाकल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात राजकारणात, बांधकाम क्षेत्रात बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हैसवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत म्हैसवाडी…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी मनपाने खास पथक तयार केले असून ते पथक अधूनमधून शहरातील विविध भागात अतिक्रमण हटावची मोहीम राबवित असतात. या मोहीमेचे जनतेकडून स्वागत केले जात असले तरी काही प्रसंगी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी हॉकर्सधारकांवर दबंगगिरी करीत असल्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. त्याचा प्रत्यय आज सकाळी सागर पार्क परिसरात आला. मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी आकाशवाणी चौफुली ते एसपी चौक दरम्यानच्या रस्त्यालगत व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या हॉकर्सधारकांविरूध्द मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असतांना सागर पार्कसमोर रस्त्यावरून लोटगाडीवर झाडांची रोपे विक्री करणाऱ्यास पथकातील कर्मचाऱ्यांनी अडविले व त्याची लोटगाडी जप्त करण्याची कारवाई करीत असतांना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातातील पिंप्राळा परिसरातील केदार नगर जवळ नाल्यात पुरुषाचा मृतदेह नाल्यात वाहून आल्याचे आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रामानंद नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विजय शिंदे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले आहे. शहरातील केदार नगर जवळ असलेल्या एका नाल्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याचे येथील नागरिकांना दिसून आले. येथील काही नागरिकांनी पोलिस प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती दिली असल्याचे समजते. या नाल्यात कसा पडला हे अद्याप कळू शकलेले नाही. रामानंद नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विजय शिंदे, पीएसआय शांताराम पाटील संपूर्ण डीबीपथक घटनास्थळी दाखल झाले.

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात एस.टी. महामंडळात एस.टी.महामंडळ चालक कर्मचारी संपावर गेले होते.या संपकाळात जे कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती या कत्राटी चालकांना ठेकेदारातर्फे व काही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कत्राटी चालकांचे पगार एस.टी.महामंडळाने 23 हजार 900 रुपये एवढा पगार एका चालकासाठी ठेकेदाराला दिले आहे,तरी कत्राटी चालक हे आप आपल्या दिलेल्या जागेवर नियुक्ती करून कर्तव्य करत आहे.तरी त्यांना वेळेवर पगार नाही,व त्यांना रात्री मुक्कामाचा भत्ता नाही जे रापमचे कर्मचारी जे काम करत आहे तेच काम कत्राटी चालक करत आहे तरी या चालकांचे आर्थिक शोषण का करत आहे,महामंडळाने नियुक्ती केलेली आहे.संस्था पगार का देत नाही का संस्थेवर महामंडळाचे कोणत्या अधिकाऱ्याचे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी आज गुरुवार दि.20जुलै2022बुधवार रोजी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन डॉ.कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे करण्यात आले या शिबिरास रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी व जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे डॉ.पवन सुशील व डॉ.प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी केली.या शिबिरामध्ये एकूण 365 गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा…

Read More