साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून लसीकरणही मोठ्या वेगाने सुरू आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे इच्छा असतानाही हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. पण यंदाच्या वर्षी सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षी असलेल्या मर्यादा हे लक्षात घेऊन गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात साजरे व्हायला हवेत. याच संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि कायदा-सुव्यवस्था राखून शांततेत हे उत्सव साजरे झाले पाहिजेत यासाठी सर्व पोलीस,…
Author: Saimat
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पेपर प्रिंन्ट असणारी साडी घातली आहे. तिची ही युनिक साडी पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर बरीच सक्रिय. तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते. आता या युनिक साडीमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. तिच्या साडीवर प्रिंन्ट झालेल्या बातम्यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक चर्चेचा विषय ठरत आहे. या लूकसाठी प्राजक्ताने साडीला साजेसा असा ब्लाऊज आणि मेकअपसुद्धा केला आहे. या हटके लूकमुळे प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे आता आरे येथील मेट्रो कारशेडचा मार्ग सुकर झाला आहे. आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, यावर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच ही स्थगिती हटवण्यात आली आहे. आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडच्या कामांना स्थगिती दिली होती.…
जळगाव : प्रतिनिधी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी एकाच दिवसात तब्बल 17 एन्जिओग्राफी व 8 रुग्णांवर मोफत एन्जिओप्लास्टी एन्जिओप्लास्टी केल्यात, यामुळे मोफत हृदयविकार निदान व उपचार अभियानातील रूग्णांना दिलासा मिळाला आहे. गोदावरी फाऊंडेशनतर्फे मलकापूर, नांदुरा गावात मोफत हृदयविकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरस्थळीच रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, ईसीजी कार्डिओग्राफ तपासणी मोफत करण्यात आली. ईसीजी खराब आलेल्या रुग्णांची टू डी इको तपासणीही नि:शुल्क करण्यात आली असून त्यातून हृदयविकाराची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्यासाठी वाहनव्यवस्थाही फाऊंडेशनने करुन दिली होती. त्यानुसार तातडीने एन्जीओग्राफीची गरज असलेल्या 17 रुग्णांना पहिल्या…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी तालुका दौऱ्यांवर भर दिला आहे. शिवसैनिकांशी थेट संवाद साधत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाकडे सर्वकाही संपले आहे, त्यामुळे आता तिकडे पत्रावळी उचलायला कोणी कशाला जाईल असा दावा केला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार देणार असल्याचे सावंत यांनी सांगीतले. शिवसेना पक्षाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन गटात विभागणी झाली आहे. मोठ्या प्रमाणात आमदार व खासदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. दरम्यान आमदारांचे समर्थकांनीही शिवसेनेला जय…
साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्याचपाठोपाठ शिवसेनेतील ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. आमदारांनंतर खासदार आणि पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली. बंडखोरी आता युवासेनेतही पोहोचली आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकले आहे. युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक आणि सहसचिव किरण साळी यांना आदित्य ठाकरे यांनी काढून टाकले आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा दावा करून या दोघांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे. युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे दिनांक २१ पासून ते २८ रोजी पर्यंत अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहला सुरुवात होत आहे जीन परीसरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन संत सावता महाराज माळी समाज मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे सकाळी ५ ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक २१ रोजी हरी भक्त पारायण कोमलसिंग महाराज सुरानेकर २२ रोजी हभप प्रमेश्वर महाराज गोडखेडेकर २३ रोजी हभप रवींद्र महाराज वरसाडेकर २४ रोजी हभप…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर काही आमदार शिंदे गटात सामील झाले आणि शिवसेनेत फूट पडली. आमदार फोडल्यानंतर शिंदेंनी खासदारांचाही गट फोडला. आमदारांपाठोपाठ १२ खासदारसुद्धा शिंदे गटात सामील झाले. एवढेच नाही तर या बंडखोर खासदारांचा वेगळा गटसुद्धा स्थापन झाला. या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. पण, आता शिवसेनेने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) जाणार आहे. त्यामुळे कोर्टामध्ये शिवसेनेची आणखी एक याचिका दाखल होणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे खासदार फोडल्यामुळे शिवसेनेमध्ये संताप निर्माण झाला आहे. शिंदे गट आणि भाजपच्या या खेळीवर शिवसेनेने आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जून रोजी शिवसेनेने…
साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा प्रतिनिधी यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतात असलेला मनुदेवी चा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सातपुड्याच्या परिसरात असलेले मनुदेवी मंदिरा जवळील पांढराशुभ्र धबधबा निखळपणे ओंसडून वाहत आहे तर हिरवळीने हा परिसर नटला असुन जनु निसर्गाने हिरवा शालु परिधान केलेला दिसुन येत आहे. दरम्यान, पर्यटकांची व भाविकांची मदीयाळी पाहता या परिसरात वावरतांना पर्यटकांनी हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हा धबधबा सुरू झाला की जिल्ह्यासह महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविक व पर्यटक मनुदेवी चा धबधबा पाहण्यासाठी येत असतात. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर…