यावल : प्रतिनिधी
केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना राबविताना आरबीआयच्या सर्व अटी,शर्ती,नियम खड्ड्यात घालून यावल येथील यावल भुसावल रोडवरील एस बँकेकडून बँक खातेदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता बँकेच्या खात्यावरून पैसे वर्ग करून घेत असल्याची तक्रार बँकेत केली असता बँक मॅनेजरकडून अरेरावीची भाषा वापरुन उद्धट वागणूक दिली जात असल्याचे बँक खातेदारांमध्ये बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेचा बँक खातेदारांना लाभ मिळावा म्हणून यावल येथील एस बँक मॅनेजरने आपल्या शाखेतील बँक खातेदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता खातेदारांच्या खात्यावरून अटल पेन्शन योजने करिता काही रक्कम परस्पर वर्ग करून घेतल्याने संबंधित खातेदार बँक मॅनेजर यांच्याकडे चौकशीसाठी गेले असता येस बँक मॅनेजर यांच्याकडून खातेदाराला अरेरावीची भाषा वापरून उद्धट वागणूक देण्यात आली माझी तक्रार कुठेही करा माझे कोणी काही करू शकत नाही असे खातेदाराला उत्तर देण्यात आले.
याबाबत बँकेत लेखी तक्रार देण्यात आली असली तरी यावल एस बँकेकडून अशा प्रकारे किती खातेदारांकडून परस्पर रक्कम वर्ग करण्यात आली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.