साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
शहरातील काही पंपावरील कर्मचारी ग्राहकांना पेट्रोल डिझेल डिलिव्हरी देतांना मशीन वरील सूचना “कृपया डिलिव्हरी लेने से पहिले शुन्य तरफ ख्याल दे ” ग्राहकांना वाचण्याची संधी न देता वाहने पुढे घेत व ग्राहकांना बोलण्यात व्यस्त ठेवतात व वाहनांमध्ये पेट्रोल दोन लिटर ऐवजी एकच लिटर वाहनांच्या टाकी मध्ये जाते अशी होते लूट ( पेट्रोल पंपावर आपण ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेलो तर आपल्या आधी गेलेल्या ग्राहकांनी अर्धा लिटर पेट्रोल भरले असेल आणि त्यवाहणाच्या मागे आपला नंबर आला आणि आपण दोन लिटर पेट्रोल टाकले असता आपल्या वाहनात दिड लिटर पेट्रोल टाकीत जाईल कारण आधीच्या वाहनात अर्धा लिटर पेट्रोल हे मशीन वरून न्यूटल (शून्य केलेले नसते) व टाकलेल्या अर्ध्या लिटर पुढे रीडिंग सुरू होते आणि तुमच्या वाहनात दिड लिटरच पेट्रोल पडते अशे वाहन दिवस भराच्या कर्मचारी यांच्या ड्युटीत दिवस भरात अनेक ग्राहक बळी पडतात व पेट्रोल पंप वरील कर्मचारी हजारो रुपयांची मायपुंजी जमा करतात यात पेट्रोल पंप मालकाचे काही नुकसान होत नाही नुकसान होते ते ग्राहकांच्या गाफीलपणा मुळे व मशीनवरील शून्या कडे लक्ष न दिल्यामुळे दिवसें दिवस पेट्रोल महाग होत आहे वरून सरकारची भरमसाठ भाव वाढ त्यात ग्राहक यांची करतात कर्मचारी लूट पेट्रोलपंप चालक यांनी आपल्या कर्मचारी यांना कडक ताकीद दिली तर ग्राहकांची लूट हि थांबू शकते मात्र पंप चालक कर्मचारी यांना पगार कमी देत असल्याने कर्मचारी अशे लुटमारीचे काम करणारच ना अशे काही ग्राहकांनी दैनिक साईमत कडे बोलतांना सांगितले, काही पंपावर पेट्रोल डिझेल असतांना शिल्लक नाही अशे फलक लावण्यात येतात अश्यावेळी तहसीलदार यांच्या कडील पुरवठा अधिकारी यांना तक्रार देऊन पेट्रोल डिझेल किती शिल्लक पुरवठा आहे किती शासकीय कोठा आहे किती विक्री साठी आहे ग्राहकांच्या हे बघणे आवश्यक आहे.
पेट्रोल पंप वर चोवीस तास सेवा अशे लिहिले जाते मात्र काही शहरातील पंप रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान कर्मचारी बंद करून देतात.
महिन्यातून एकदा तरी पुरवठा अधिकारी यांनी प्रत्येक पेट्रोलपंप वर जाऊन मशीन द्वारे पाच लिटर पेट्रोल डिझेल माप चेक केले पाहिजे
पेट्रोल पंपावर संडास बाथरूम पाण्याची व्यवस्था ठेवली पाहिजे काही पंपावर ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहे मात्र स्वच्छता अजिबात नाही काही ठिकाणी संडास बाथरूम बंद अवस्थेत किंवा फक्त कर्मचारी यांना वापरण्यासाठी कुलूप उघडले जाते काही पंपावर ग्राहकांना कर्मचारी उद्धटपणे वागणूक देतात अश्या अनेक तक्रारी समोर आल्याने पेट्रोलपंप चालक मालक व संबंधित अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे.