Author: Saimat

भुसावळ : प्रतिनिधी शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असतांनाही भुसावळात आढळून आल्याने खरांत बंधूंसह चौघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजकुमार खरात, त्यांचे बंधू राजन खरात यांच्यासह त्यांच्या साथीदारांना भुसावळ पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र हद्दपार असतांनाही ते शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरातील खरात यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या पथकात शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक गजानन पडघन, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांचा समावेश होता. या पथकाला राजकुमार खरात आणि राजन खरात यांच्यासह दोन…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा केंद्रीय शिक्षण बोर्ड दिल्ली (सीबीएससी) दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत  विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. बारावीत प्रथम क्रमांक पटकावत यश महाजन ९४.२० पार्थ पंत ८८.८० पियुष चंद्रे ८७ प्रथमेश कौजलगी८४.२० करिष्मा पाटील ८२.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत. तर , दहावीत रुद्रेश गांगुर्डे९७.४० भक्ती मेटकर ९१.४० वसुंधरा शिंदे ८८ स्नेहल पाटील८४.६० भूमिका डिंकराई ८०.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील , संचालक पराग पाटील,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात दुसऱ्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सकडून ह्युदाईला तगडं आव्हान मिळू लागलं आहे. मे महिन्यात टाटाने ह्युंदाईचं बाजारातलं दुसरं स्थान हिसकावलं होतं. तेव्हापासून ह्युंदाई कंपनी भारतीय वाहन बाजारात आक्रमकपणे नवीनवीन उत्पादनं लाँच करतेय. गेल्या महिन्यात ह्युंदाईने भारतात त्यांची वेन्यू ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन अवतारात लाँच केली. त्यानंतर कंपनीने त्यांची प्रीमियम एसयूव्ही ह्युंदाई टक्सनवरून (Hyundai Tucson) पडदा हटवला आहे. आता कंपनी आगामी काळात भारतीय वाहन बाजारात अनेक नवीन उत्पादनं लाँच करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंदाई मोटर इंडिया कंपनी आगामी काळात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राज्यातील सत्तापालटानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत फूट पडण्यासाठी उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच संपली, उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नाही, असे राज ठाकरे  यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे हेच असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मनसेच्या या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बाळासाहेबांच्या…

Read More

नवी दिल्ली: प्रतिनिधी  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray )यांचा पुतळा महाराष्ट्र सदनमध्ये तसेच तैलचित्र नवीन संसदेच्या इमारतीमध्ये लावण्यासाठी सर्व खासदारांनी मागणी केली आहे. त्यावर पंतप्रधान मोदींकडे (PM Modi)पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. त्यांनी शिंदे गटाच्या सर्व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale)यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात उभारण्याची त्या निवेदनात मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातून यूपीएससीच्या अभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी दरवर्षी…

Read More

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील सर्व इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही हे स्पष्ट केले. यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने भाजपमधील इच्छुकांना आापला नंबर लागणार की नाही, अशी धाकधूक आहे. शिवसेना – भाजप युतीच्या काळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून जवळपास 43 जणांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्या काळात मंत्रिपद भूषवलेले काही जण कुठल्या ना कुठल्या कारणाने आता पुन्हा मंत्रिपदावर दिसणार नाहीत. कसे बदलणार चित्र? 2014 ला भाजपचा मुख्यमंत्री असताना ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी स्व. ॲड. सिताराम (बबन भाऊ )बाहेती यांचे जयंती निमित रोहन बाहेती आयोजित जळगाव जिल्हा कॅरम असो.च्या मान्यतेने व जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने 31 जुलै व 1 आगस्ट 2022 दरम्यान जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी व वयस्कर गटात होईल. कांताई हॉलमध्ये ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना तब्बल 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज जळगाव कॅरम असोसिएशनच्या माध्यमद्वारा कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नावे 29 जुलाई 2022 पर्यंत जिल्हा कॅरम संघटनेकडे नोंदवावीत असे आवाहन कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा व सरकार्यवाह नितिन बरडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब जळगाव स्टार्स व सुगोकी गृप पाळधीतर्फे वृक्षारोपण तसेच सहा हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. तालुक्यातील वराड बुद्रुक येथे 28 एकर जागेमध्ये सहा हजार वृक्ष लावण्याचा संकल्प आहे.त्याचे संगोपनसुद्धा क्लब व सुगोकी गृप करणार आहे.अध्यक्षस्थानी जिनल जैन हे होते. सागर मुंदडा, धनराज कासट, करण ललवाणी, विपुल पटेल, सचिन बलदवा, हर्षल कटारिया, जिगर पटेल, चिराग शहा, निमित कोठारी, निकुंज बियाणी, हर्षल देशमुख, आर्यन मणियार, आकाश पोद्दार, प्रकल्प प्रमुख पुनीत तलरेजा, मधुर झवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी धनराज कासट यांनी सहकार्य केले.

Read More

पुणे : प्रतिनिधी इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची ( plane crashed )धक्कादायक घटना घडली आहे. कडबनवाडी येथे हे शिकाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या विमानात एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती. बारामतीतील विमानतळावरून सकाळी या विमानाने उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’ मार्फत महिला पायलट यांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले. ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या महिला पायलटला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये म्हणून वयोगट 6 ते 18 च्या शाळाबाह्य मुला मुलींचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य आढळणाऱ्या मुला मुलींना वयानुरूप शाळेत दाखल करावे असे असताना शाळाबाह्य विद्यार्थी यांना शाळेच्या प्रवाहात आणले जाते परंतु पुन्हा एक-दोन वर्षात ते शाळाबाह्य होतात असे अनुभव येत असतो. मात्र यास अपवाद ठरत भुसावळच्या युक्ती चोरडिया या शाळाबाह्य विद्यार्थीनीने शिक्षण प्रवाह येऊन दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवत गरुड भरारी भरारी घेतली आहे. दरम्यान , मिशन झिरो ड्रॉप उपक्रमाचे युक्ती चोरडिया जिल्ह्यातील रोल मॉडेल ठरू शकते अशी प्रतिक्रीया शिक्षण क्षेत्रात उमटत आहे. शिक्षण प्रवाहात विद्यार्थी निरंतर टिकला पाहिजे…

Read More