मुक्ताईनगर ‘त्या’ हल्ल्या प्रकरणी आरोपीना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलनाचा इशारा  

0
2

मुक्ताईनगर :प्रतिनिधी 

तरुणीच्या आक्षेपार्ह पोष्ट व महीलांद्वारा मारहाण प्रकरणी या घटनेला काही समाज कंटकांनी धार्मिक रंग दिल्याने १५० ते २०० जमावाचे माथी भडकावून  त्यांच्या व्दारे त्या घटनेशी शिवराय नगर प्रभाग क्र १२ मधील कोणत्याही व्यक्तीचा काडीचाही संबंध नसताना या हिंदू वस्तीत १५० ते २०० च्या संख्येतील बेकायदेशीर जमावाने तलवारी, लाठ्या काठ्या , सळई, रॉड, ज्वलनशील साहित्य हातात घेवून काही घरांची नासधूस, दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड , घरांवर दगड फेक करित एका महिलेच्या मानेवर तलवार रोखून मारहाण केली.तसेच एका रहिवाशी मजुराच्या पायावर काहीतरी मारून त्याचा पाय मोडला असा नंगानाच करीत असताना धार्मिक नारेबाजी , आरड  ओरड, महिलांना अश्लील शिवीगाळ करून दहशत माजविली. ५० वर्षात अशी घटना घडली नसल्याने येथील एकात्मता व जातीय सलोखा कायम राहणे आवश्यक आहे. सदरील दंगेखोरांचे  सी सी टी व्हीं मध्ये कारनामे कैद असताना पोलिस प्रशासनाने गेल्या दोन दिवसात कुठलीही कारवाई न केल्याने , पोलिसांचे भूमिकेवर शंका उत्पन्न होत असून शहरातील व आमच्या प्रभागातील  सर्व नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था पुन्हा स्थापित करण्यासाठी दंगे खोर व याचे मास्टर माईंड यांना तात्काळ अटक करा अशा मागणीचे निवेदन  शिवराय नगरातील नागरिकांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके  यांना लेखी दिले असून ३ दिवसांचा अल्टिमेटम देत प्रचंड आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदन देतेवेळी कल्पना पालवे, सरिता कोळी, यशोदा माळी, बेबाबाई इंगळे, अनिता मराठे, रेखा कदम, विमलबाई सोनार, संगीता श्रीखंडे, शकुंतला भोई, सुरेखा माळी, ज्योती मालचे यांचेसह नगरसेवक संतोष मराठे, सचिन (पिंटू) पाटील, दीपक पवार, स्वप्नील श्रीखंडे, भावेश बिरारी, अक्षय सोनार, कृष्णा मोहोड, सागर सनांसे, किरण महाजन, अनुज मनोज पालवे, विनीत माळी, राहुल सनांसे, किरण मिस्तरी, विशाल गोसावी, चेतन कांडेलकर, निलेश लवांडे, तुषार सोनार, गणेश भोजने आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here