Author: Saimat

चोपडा : प्रतिनिधी गोरगावले शिवारातील चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीची हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत झालेल्या महिलेचे नाव लीलाबाई बारेला असून पती संशयीत आरोपीचे नाव ग्यानसिंग बारेला असे आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरगावले शिवारातील ग्यानसिंग बारेला हा त्यांच्या पत्नी लीलाबाई बारेला यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करत होता. दि २७ रोजी रात्री ८ वाजता पत्नीसोबत वाद होत ग्यानसिंग याने मारहाण करीत असताना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील गोरगावले शिवारात राहणारे बारेला…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ‘ओबीसींसाठी माझा पायगुण चांगला आहे असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आता ओबीसींसोबत निवडणुका होतील. मात्र आता जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पायागुण वाईट असेच म्हणावे लागेल.’ अशी बोचरी टीका व्हीजेएनटी अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका  ‘महाराष्ट्रात ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका ओबीसीशिवाय होणार याबाबत सुप्रीम कोर्टाकडून  जाहीर करण्यात आले आहे. गेले काही दिवस आम्ही आनंद साजरा केला. ओबीसी आरक्षण म्हणून निवडणूका होणार, मात्र आज कोर्टाची ऑर्डर आली की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, वाईट वाटलं…’ ‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते की,…

Read More

साईमत लाईव्ह शिरपूर प्रतिनिधी : धुळे येथे राष्ट्रवादी भवनचे नूतनीकरण झाले आहे. त्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी शरद पवार  शनिवारी(२९जुलै) येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे. धर्मांध शक्तीविरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या कार्यक्रमातून बळ मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी सांगितले. खासदार पवार हे नाशिकहून शनिवारी (३०जुलै) ला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी ११.३० धुळ्यात आगम होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगुज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी  पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू असतांना शेतीचे कामेही खोळंबली आहेत आणि त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना त्वरित सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पाचोरा काँग्रेस ने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. पाचोरा काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसिल कार्यालया समोर ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशा विविध घोषणाबाजी करत निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास…

Read More

यावल : प्रतिनिधी  यावल केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी करण्यात येत असुन त्या अनुशंगाने यावल नगपालिकेच्या माध्यमातुन पथविक्रेता सर्वेक्षण सुरु आहे.आतापर्यंत एकूण 276 पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली असून 10 ऑगस्ट 2022 पर्यंत पथविक्रेत्यांची नोंदणी केली जाणार आहे तरी पथविक्रेत्यांनी यावल नगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन यावल नगरपालिका मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे यावल नगपरिषदेच्या माध्यमातुन आज पर्यंत २७६ पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन शहरात १० ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी पथविक्रेत्याजवळ नोंदणी करताना आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर, रेशनकार्ड,जात प्रमाणपत्र, डोमेसाईल,दिव्यांग असल्यास दिव्यांग…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस असल्याने सर्वत्र ठिकाणी बांधकामाचे काम बंद होते.त्यानंतर या आठवड्यात पावसाचे सावट कमी होताच बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात वाळूची मागणी असल्याने वाळूमाफीया चांगलेच कामाला लागले आहे. दि.29 रोजी सकपहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास तांबापूरा भागातील रस्त्यावरुन जाणारे डंपर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापूरा परिसरात मुख्य रस्त्यावर दि.29 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरटी वाळूची वाहतूक सुरु असतांना एम.एच.19.बी.व्ही.7117 हे डंपर वाळू उपसा करण्यासाठी नेत असतांना कर्तव्यावर असलेले पोलिस अशपाक महेमुद शेख यांच्या लक्षात आले यांनी लागलीच या डंपरला थांबवत पाहणी केली असता. त्या डंपरमध्ये विनापरवाना…

Read More

यावल : प्रतिनिधी  गजानन मधुकर सोनार या ठेकेदारास म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकामासाठी वर्कऑर्डर मिळाल्यानंतर दुसऱ्याच गट नंबर मध्ये बांधकाम सुरु असल्याने याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात नेमकी काय नोंद आहे? याबाबतची माहिती मिळण्यासाठी म्हैसवाडी येथील किरण गोपाळ पांडव यांनी ग्रामसेवक यांच्याकडे दि.9 जून 2022 रोजी अर्ज केला आहे परंतु ग्रामसेवकांने मुदतीत व मुदत संपल्यावर सुद्धा आज दि. 29 जुलै 2022 पर्यंत माहिती न दिल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम संदर्भातील ठरावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाबाबत गजानन मधुकर सोनार यांना वर्क ऑर्डर दिली आहे ही वर्क…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी गं.भा.रेनाबाई तुकाराम वाणी(वय 100) यांचे दि.29 रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.29 रोजी संध्याकाळी 6 वा. त्यांच्या राहत्या घरुन 22, मनोकल्प जिल्हा परिषद कॉलनी, श्रीकृष्ण मंदिर जवळ, गणेश कॉलनी जळगाव येथून निघेल. त्या मनोज लिलाधर वाणी यांच्या आजी होत.

Read More

सोयगाव : प्रतिनिधी   छायाचित्रओळ-सोयगाव पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडती दरम्यान तहसीलदार रमेश जसवंत,उपविभागीय अधिकारी संजीव मोरे व इतर,दुसऱ्या छायाचित्रात लहान मुलाच्या हाताने चिट्ठीद्वारे सोडत काढतांना.  सोयगाव, दि.२८…आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गुरुवारी पंचायत समितीच्या सहा गणांची सोडत काढण्यात आली.या आरक्षण सोडतीत पंचायत समितीच्या सहा गनांपैकी सावळदबारा,बनोटी आणि आमखेडा हे तीन गण महिलांसाठी राखीव झाले असून फर्दापूर,निंबायती आणि गोंदेगाव या तीन गणासाठीच पुरुषांना संद्झी मिळाली असून सोयगावला जिल्हा परिषदेचे तिन्हीही गट अनुसूचित जाती साठी राखीव झाल्याने दिग्गजांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे.     आगामी जिल्हा  परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गुरुवारी सोयगाव पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समितीच्या…

Read More