Author: Saimat

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सांगवी शिवारात येथील प्रगतीतील शेतकरी दीपक भाऊराव पाटील यांच्या कपाशी शेतात सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कपाशी पिकावरील फवारणी ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक करण्यात आले सिजेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आयोजित सिजेंटा ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक रथाचे 15 जुलै 2022 पासून पुणे येथून सुरुवात करण्यात आली नाशिक संभाजीनगर जळगाव धुळे तर मध्य प्रदेशात देशभरात दहा हजार किलोमीटर प्रवास करून भारतातील सर्व भागात शेतकऱ्यांना पिकावरील ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे सिजेंटा इंडिया प्रायव्हेट कंपनी हे प्रात्यक्षिक सेवा आगामी काळात शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम करून शेतकऱ्यांचे ड्रोन दारे फवारणी करून कमी श्रमात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला असून राज्यात सत्ता परीवर्तन निश्चित आहे, असे प्रतिपादन केले. अनेक आमदार भावनेच्या भरात शिंदे गटात गेले आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी येथील धुळे रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा, धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ रोजी रात्री मृत्यू झाला. धुळे-अमळनेर रस्त्यावरील स्वादिष्ट नमकीनजवळ २५ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास, ओव्हरटेक करताना चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील साडेचार वर्षांच्या बालकाच्या पाय तुटला होता. तर दुचाकीचालक चालक कैलास नंदलाल पाटील यांच्या पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २६ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृत कैलास पाटील यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार अाहे. जानवे येथे २७ रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ११ जुलै रोजी कसबे सुकेणे दिक्षी ओझर रस्त्यावर दिक्षी गावाजवळ रात्रीच्या वेळी हिंदुंच्या पवित्र एकादशीच्या दिवशीच कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडला व गाईची सुटका झाली ही घटना ताजी असतांनाच काल मंगळवारी रात्री साडेनऊ या सुमारास भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दिक्षी जिव्हाळे शिवावर पलटी झाला आजुबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली व मदतीसाठी टेम्पो जवळ जाताच त्यात एक गाय व तीन बैल आढळले तेव्हा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले .नागरिक जमा होताच गाडीतील ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर रवींद्र धुमाळ हा नागरिकांच्या तावडीत सापडला थोडक्यात हकीकत अशी की रविंद्र सुरेश…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची समीक्षा करण्यासाठी विविध कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकींमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांपासून पोलिसांच्या घरकुलापर्यंत अनेक गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन योजना व सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भरघोस निधी मंजूर करून दिला. मुख्यमंत्री होताच त्यांनी विधिज्ञांची फौज उभी करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला. त्यामुळे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सिल्लोड येथे 31 जुलै रविवार रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे केले. सिल्लोड येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार व विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सोयगाव येथे आयोजित पूर्वतयारी बाबत आढावा बैठकीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात तरसोद येथील व्यक्ती कामावर जात असताना अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव – भुसावळ महामार्गावर असलेल्या गौरव हॉटेलपासून ते चौपदरीकरण झालेल्या हायवेपर्यंतचा रस्ता हा खूप अरूंद असल्याने यावर कायम लहानमोठे अपघात होत असतात. याच प्रकारे रात्री एका मोटारसायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. तरसोद येथील रामचंद्र चिंधू कुंभार हे रेमंड कंपनीत कामाला असून ते रात्री साडेदहाच्या सुमारास ड्युटीवर जात होते. महामार्गावरील चांडक हॉस्पीटलच्या परिसरात ते एका ट्रकच्या मागील चाकात असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी डांभुर्णी येथील रहिवाशी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी आज बुधवार दि.27 रोजी दुपारी 15:30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,अर्चना कोळीचे माहेर हे सुरतचे असून डांभुर्णी येथे ती 16/17 वर्षांपासून लग्न होऊन आली होती.घरातील सर्व परिवार व कुंटूंबाची संपूर्ण जबाबदारी ती पर पाडत होती.सासरी ती सुखी समाधानी आनंदी होती.मात्र तीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेने हे कुटुंब उघडे पडले आहे.आज दुपारी अर्चना ही घरात एकटी असतांना तिचे सासरे व पती हे कामानिमित्त बाहेर गेले होते व त्यांची मुले शाळेत गेलेले असतांना आपल्या घरात गळफास घेत तीने आपली…

Read More

मेष (Aries) मंगल कार्यांसाठी गुरुवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे. वृषभ (Taurus) दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल. मिथुन (Gemini) तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल. कर्क (Cancer) शिक्षण घेण्याऱ्यांसाठी बुधवार चांगला दिवस आहे.…

Read More

पिंपळगाव बु. : प्रतिनिधी  पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी संतोष रामा पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र संतोष पांढरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. संतोष पांढरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, औरंगाबादचे विभागीय सचिव प्रवीण तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. पांढरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष…

Read More