चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

0
4

जळगाव ः प्रतिनिधी

शहरात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस असल्याने सर्वत्र ठिकाणी बांधकामाचे काम बंद होते.त्यानंतर या आठवड्यात पावसाचे सावट कमी होताच बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात वाळूची मागणी असल्याने वाळूमाफीया चांगलेच कामाला लागले आहे. दि.29 रोजी सकपहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास तांबापूरा भागातील रस्त्यावरुन जाणारे डंपर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील तांबापूरा परिसरात मुख्य रस्त्यावर दि.29 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरटी वाळूची वाहतूक सुरु असतांना एम.एच.19.बी.व्ही.7117 हे डंपर वाळू उपसा करण्यासाठी नेत असतांना कर्तव्यावर असलेले पोलिस अशपाक महेमुद शेख यांच्या लक्षात आले यांनी लागलीच या डंपरला थांबवत पाहणी केली असता. त्या डंपरमध्ये विनापरवाना सुमारे 10 हजार रुपये किंमतीची अडीच ब्रास वाळू मिळून आली तर डंपर साधारण 5 लाखांचे मिळून आले. याप्रकरणी आरोपी कमलेश रमेश देवरे रा.दादावाडी श्रीराम नगर याच्यावर विना परवाना वाहतूक भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी सपोनि अमोल मोरे दाखल झाले होते. तर याप्रकरणी पोहेकॉ.जितेंद्र राठोड, अल्ताफ पठाण हे अधिकारी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here